शिक्षकांची ‘टीईटी’ परीक्षा घोषित
By Admin | Updated: October 19, 2015 00:54 IST2015-10-19T00:54:38+5:302015-10-19T00:54:38+5:30
जिल्ह्यातील डीटीएड, बीएड पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना भविष्यात शिक्षक होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक

शिक्षकांची ‘टीईटी’ परीक्षा घोषित
ठाणे : जिल्ह्यातील डीटीएड, बीएड पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना भविष्यात शिक्षक होण्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) २७ डिसेंबरला घेण्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने घोषित केले आहे. त्यासाठी उमेदवारांनी आॅनलाइन अर्ज भरण्यास प्रारंभ केला असून ४ नोव्हेंबर हा शेवटचा दिवस आहे.
आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर मिळणाऱ्या पावतीसह उमेदवारांनी कागदपत्रांच्या सत्यप्रती आणि अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांसह महापालिका, नगरपालिका आदींच्या कार्यक्षेत्रांमध्ये जिल्ह्यात ११ कक्ष सुरू करण्यात आले आहेत. अधिक माहितीसाठी या कक्षांशी संपर्क साधण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने केले आहे. उमेदवारांनी चलनाव्दारे बँकेत शुल्क भरून आॅनलाइन अर्ज ट्रॅन्झॅक्शन आयडीसह अपडेट करण्यासाठी ५ नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे. आवेदनपत्र, चलनप्रत, जात प्रमाणपत्र, तालुका गटशिक्षणाधिकारी कार्यालयात ६ नोव्हेंबरपर्यंत जमा करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)