शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांनी दिले सर्वांगीण विकास साधणारे शिक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 02:37 IST

गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती.

- स्नेहा पावसकरठाणे : चांगले गुण मिळवणं, हे आज प्रत्येकाचं ध्येय आहे, पण त्याचसोबत कुतूहल वाढवणारं आणि सर्वांगीण विकास करणारं शिक्षण मिळणं गरजेचं आहे. आमच्या शिक्षकांनी अशाच प्रकारचे शिक्षण दिले. आम्ही जे घडलो, त्यात शिक्षकांचे सर्वाधिक योगदान आहे, असे मत व्यक्त केले आहे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञडॉ. अनिल काकोडकर यांनी.गावात असलेल्या शाळेत गावातलीच मुलं, शिक्षक असायचे. त्यामुळे आपली नाती, समाज यांच्याशी चांगले ऋणानुबंध तयार झाले होते. शिक्षणासाठी आवश्यक असणारी चांगली इको सिस्टीम तिथे होती. - डॉ़ अनिल काकोडकरशालेय शिक्षणातहीआईच माझी पहिली गुरूमध्य प्रदेशातील खरबोन या लहानशा गावात माझे प्राथमिक शिक्षण झाले. मध्य प्रदेशात सर्वत्र हिंदी शाळा होत्या. परंतु, आम्ही राहत होतो, त्या गावात साधारण २०० मराठी कुटुंबं राहत होती. माझ्या आईने माँटेसरी स्कूलचा कोर्स केलेला होता. त्या गावात आईने मराठी माध्यमाची माँटेसरी सुरू केली. त्यामुळे शालेय शिक्षणातही माझी आई हीच माझी पहिली गुरू ठरली.शिक्षकांनीच सांगितलं, पुन्हा ट्युशनचं नाव काढू नकोसमी साधारण आठवी-नववीला होतो. अभ्यासात मी हुशार होतोच, पण दहावीला चांगले गुण मिळावे, या हेतूने आईने मला ट्युशनला जाण्यास सुचवले. आमच्या शाळेतीलच काही शिक्षक गरीब विद्यार्थ्यांचे ट्युशन घेत असत. मीही बुद्धिवंत सरांकडे ट्युशनसाठी गेलो. पहिल्याच दिवशी त्यांनी मला, ‘तू इथे का आलास?’ असे विचारले.‘ट्युशन या पास होण्याची खात्री नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी असतात. तू तर हुशार आहेस, फक्त मेहनत कर. काही अडचण असेल तर मला कधीही, कुठेही शंका विचार, पण पुन्हा ट्युशनचं नाव नको काढूस’, असं सांगितलं. शिक्षण हा तेव्हा धंदा नव्हता, हे नक्की.मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांतून झाले शिक्षणप्राथमिक शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळेत झाले. मात्र, गावाबाहेर पडले की, हिंदीच भाषा वापरली जायची. त्यामुळे माध्यमिक शिक्षण हिंदी माध्यमाच्या शाळेत झाले, तेव्हा भाषेची अडचण वाटली नाही. तर, हिंदी माध्यमात शिकताना पुस्तकात इंग्रजी परिभाषा म्हणून दिलेली असे. त्यामुळे महाविद्यालयात इंग्रजीतून शिक्षण घेतानाही भाषेचा अडसर आला नाही. तिन्ही भाषांतून माझे शिक्षण झाले आणि मी त्या भाषांसोबत नेहमी कम्फर्टेबल होतो.सरांचं ‘ते’ वाक्य स्मरणात राहिलंमी इंजिनीअरिंगला प्रवेश घेतल्यावर पहिल्याच वर्गात सर आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत, इंजिनीअरिंगमध्ये नॉलेज इज टेन (१०) पर्सेंट अ‍ॅण्ड नाइंटी (९०) पर्सेंट कॉमनसेन्स आहे, असे सांगितले. त्यांचे हे वाक्य कायम स्मरणात राहिले. शैक्षणिक प्रवासासह खऱ्या आयुष्यातही ते लागू पडते.

टॅग्स :Teachers Dayशिक्षक दिनthaneठाणे