शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आता होणार रद्द; शिक्षकांना दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2018 00:19 IST

राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली.

- सुरेश लोखंडेठाणे : राज्यभरातील सुमारे आठ हजार ५०० शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमुळे बहुतांश शिक्षक त्रस्त आहेत. शिक्षकांच्या अडीअडचणी विचारात घेऊन ग्रामविकास विभागाने त्यांना त्यांच्याच जिल्ह्यात राहण्याची मुभा बुधवारी दिली. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. राज्यभरातील शिक्षकांना या निर्णयाने दिलासा मिळाला असून, त्यांना शासनाने दिवाळीपूर्वीच ही भेट दिली आहे.२०१७-१८ या शैक्षणिक वर्षात राज्यभरातील शिक्षकांच्या झालेल्या आंतरजिल्हा बदल्यांमध्ये ठाणे जिल्ह्यातील सुमारे २०० शिक्षकांचा समावेश होता. पालघरच्याही बहुतांश शिक्षकांची ठाणे जिल्ह्यात बदली झाली. या बदल्या शिक्षकांच्या दृष्टीने गैरसोयीच्या ठरल्या. काहींच्या इच्छेनुसार बदल्या झाल्या. मात्र त्यांच्यासोबत जोडीदाराची बदली झाली नसल्याने कौटुंबिक अडचणी वाढल्या. इतर कारणांमुळेही शिक्षकांनी बदल्या रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला. त्यास अनुसरून या आंतरजिल्हा बदल्या रद्द करण्यासाठी ग्राम विकास विभागाने सुधारित धोरण हाती घेऊन तसा शासन निर्णय जारी केला. त्यानुसार सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या बदल्या रद्दकरण्याचे लेखी आदेश जारी केले आहेत.ज्या शिक्षकाना आंतरजिल्हा बदल्या नको आहेत, अशा शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये विविध अटी व शर्तींवर कायम ठेवण्याचे आदेश आहेत. दिवाळीच्या दीर्घ सुट्यांमध्ये शिक्षकांना त्यांच्या मूळ जिल्हा परिषदेमध्ये पाठविण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांनी करावी, असे आदेश ग्रामविकास विभागाने जारी केले आहेत.शिक्षकांना मूळ जिल्ह्यात जाण्यासाठीच्या अटी व शर्तीसंबंधित शिक्षकास अद्याप कार्यमुक्त केलेले नसल्यास त्यांना त्याच जिल्हा परिषदेमध्ये ठेवण्यात यावे. त्यांना कार्यमुक्त करू नये. त्यांची बदली रद्द झाल्याचे आदेश सीईओ यांनी काढावेत.कार्यमुक्त केलेले असल्यास वा त्यांना आंतरजिल्हा बदली नको असल्यास, त्यांना ज्या जिल्हा परिषदेमध्ये परत जावयाचे आहे, तेथे संबंधित शिक्षक धारण करीत असलेल्या प्रवर्गात पद रिक्त असणे गरजेचे आहे.संबंधित शिक्षकाने आंतरजिल्हा बदली रद्द केल्यानंतर, पुढील पाच वर्षे त्यांना आंतरजिल्हा बदली मागण्याचाअधिकार राहणार नाही.शिक्षकांना पुन्हा त्यांच्या मूळ जिल्ह्यात परत पाठविल्यास त्यांची सेवाज्येष्ठता बाधित होणार नाही.

टॅग्स :Teacherशिक्षक