शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

शिक्षिकेची साडेबारा लाखांची फसवणूक, फेसबुकवर केलेली मैत्री पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2019 01:00 IST

यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे.

कल्याण : यूकेमध्ये शिपवर कॅप्टन म्हणून काम करत असल्याची बतावणी करून फेसबुकवरून ओळख वाढवत एका ३८ वर्षीय शिक्षिकेला सुमारे साडेबारा लाखांचा गंडा घातल्याची घटना कल्याणात उघड झाली आहे. याप्रकरणी सिंग कुमार आणि नासीर अली यांच्याविरोधात खडकपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.पश्चिमेतील टावरीपाडा परिसरात राहणाऱ्या सुरेखा (३८, नावात बदल) या शिक्षिकेची सिंग कुमार नावाच्या व्यक्तीसोबत १० मार्च २०१९ रोजी फेसबुकद्वारे मैत्री झाली. त्यानंतर, दोघांमध्ये चॅटिंग सुरू असताना मोबाइलद्वारे ते एकमेकांच्या संपर्कात आले. कल्याणमध्ये घर घ्यायचा विचार करत असून माझ्याकडील ५० हजार यूके डॉलर्स तुला पाठवतो, असे त्याने सुरेखाला सांगितले. त्यानंतर, १८ मार्चला सुरेखा यांना एका व्यक्तीने संपर्क साधत दिल्ली येथील कस्टम आॅफिसमधून बोलत असल्याचे सांगितले. फोन करणाºया व्यक्तीने पोलंडवरून आलेले पार्सल क्लिअरिंग करायचे असल्यास ४७ हजार रुपये भरावे लागतील, असे सुरेखा यांना सांगितले. ही माहिती सुरेखा यांनी कुमारला दिली असता त्याने कसेही करून पार्सल सोडवून घेण्यास सांगितले. कुमारच्या सांगण्यावरून सुरेखा यांनी ४७ हजार रुपये जमा केले. पैसे जमा झाल्यानंतर सुरेखा यांना एक मेल आला, ज्यात पार्सलमध्ये पैसे असून त्यासाठी अ‍ॅण्टी मनी लॉडरिंग सर्टिफिकेट घ्यावे लागेल, असे लिहिले होते. त्यासाठी नासीर अली नावाच्या व्यक्तीने सुरेखा यांच्याशी संपर्क साधून एक लाख १५ हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार, सुरेखा यांनी ही रक्कम त्या खात्यावर जमा केली. त्यानंतर, सुरेखा यांना पुन्हा मेल आला, ज्यात ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा करण्यात येणार असून त्यासाठी तीन लाख ६८ हजार रुपये जमा करावे लागतील, असे लिहिले होते. त्यानंतर, कुमार आणि त्याच्या साथीदाराने पार्सल जप्त करण्याची भीती घालून वेगवेगळ्या खात्यांवर १२ लाख २४ हजार रुपये भरायला भाग पाडले.>युनायटेड किंगडममध्ये नोकरीला असल्याची बतावणी करणाºया आरोपी कुमार याने कल्याणची पीडित शिक्षिका सुरेखा हिच्याशी फेसबूकवर मैत्री केली होती. कुमारकडून आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सुरेखा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

टॅग्स :Facebookफेसबुक