शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

गणित सोडवताना हाच्चा दिला नाही म्हणून सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2018 23:05 IST

मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थिनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.

मीरारोड : मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थीनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.मुर्धा गावात महापालिकेची मराठी शाळा असून सदर शाळेत शिकणारी ११ वर्षाची विद्यार्थिनी ही ६ वी इयत्तेत शिकते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी शाळेची वेळ आहे. आज सोमवारी नेहमीप्रमाणे ही विद्यार्थीनी शाळेत गेली. दुपारी वर्ग शिक्षिका सायली पिंपळे या गणिताची चाचणी घेत होत्या. त्यावेळी फळ्यावर गणित सोडवण्यास सदर विद्यार्थिनीस सांगितले असता भागाकार करताना हाच्चा लिहायाचे राहिले जेणे करुन संपूर्ण गणित चुकले. याने संतप्त झालेल्या पिंपळे यांनी काठी विद्यार्थिनीच्या दंडावर जोरात मारली. तसेच तिच्या डोक्यावर देखील मारहाण केली.शाळा सुटेपर्यंत ती विद्यार्थिनी वर्गात हात दुखत असताना देखील तशीच बसून होती. तिच्या दंडावर मारहाणीमुळे मोठा व्रण आला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी गेली असता घडला प्रकार आईला कळला. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. त्या शिक्षिकेस आम्ही पोलीस ठाण्यात बोलावले असून चौकशीनंतर पुढील कार्यवाहीचे ठरेल असे पोलीस सुत्रांनी सांगितले.

टॅग्स :Crimeगुन्हा