शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

शिक्षक पुरस्कार : मानापमानाचा रंगला तास , पत्रिकेत नाव नसल्याने भाजपा पदाधिकारी गैरहजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 06:32 IST

कधी सणासुदीमुळे तर कधी समारंभास मान्यवर उपलब्ध नसल्यामुळे नंतर निवडणूक आचारसंहितेमुळे अशा अनेक कारणांमुळे रखडलेल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक गौरव समारंभास अखेर तब्बल सहा महिन्यांनी बुधवारी मुहूर्त मिळाला.

शहापूर : कधी सणासुदीमुळे तर कधी समारंभास मान्यवर उपलब्ध नसल्यामुळे नंतर निवडणूक आचारसंहितेमुळे अशा अनेक कारणांमुळे रखडलेल्या तालुक्यातील आदर्श शिक्षक गौरव समारंभास अखेर तब्बल सहा महिन्यांनी बुधवारी मुहूर्त मिळाला. या गुणगौरव समारंभास मानापमानाचे गालबोट लागले. निमंत्रण पत्रिकेवर राष्ट्रवादी,शिवसेना या पक्षातील प्रमुख पदाधिका-यांची नावे होती. मात्र भाजपाचे तालुका अध्यक्ष भास्कर जाधव तसेच अन्य पदाधिकारी यांची नावे छापली नाहीत. यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांनी या कार्यक्र मास अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, खासदार चिंतामण वनगा यांच्या निधनामुळे खासदार कपिल पाटील उपस्थित राहू शकले नाहीत.दरवर्षी ५ सप्टेंबरला पंचायत समितीतर्फे होणारा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ येथील वैश्य समाज सभागृहात पंचायत समितीच्या सभापती शोभा मेंगाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या कार्यक्र मास ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मंजुषा जाधव, आमदार पांडुरंग बरोरा, मुरबाड पंचायत समितीचे उपसभापती सुभाष पवार, कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेनेचे माजी आमदार दौलत दरोडा, ठाणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस(ग्रामीण) अध्यक्ष दशरथ तिवरे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, तालुकाप्रमुख मारु ती धिर्डे, काशिनाथ तिवरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाप्रमुख नंदकुमार मोगरे तसेच नवनिवार्चित निवडून आलेले सदस्य उपस्थित होते.शिक्षकांच्या गुणगौरव समारंभ कार्यक्रम पत्रिकेवर शिवसेना, राष्ट्रवादी या पक्षप्रमुख आणि पदाधिकारी यांची नावे छापली. परंतु या पत्रिकेवर जाणूनबुजून भाजपाचे तालुका अध्यक्ष जाधव यांचे नाव नसल्याने नाराज झालेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ही बाब दोन दिवसापूर्वी कल्याणचे आमदार नरेंद्र पवार यांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांनी शहापूर पंचयात समितीच्या प्रशासना कडे नाराजी नोंदविली. तोपर्यंत निमंत्रण पत्रिका वाटून झाल्या होत्या. हे प्रकरण अंगाशी येईल म्हणून नव्याने निमंत्रण पत्रिका छापल्या. त्यात जाधव यांचे नाव छापण्यात आले.या संदर्भात भास्कर जाधव यांना विचारले असता ते म्हणाले पंचायत समितीत शिवसेनेची सत्ता आहे. त्यांच्या दबावाखाली येऊन आमची नावे वगळली, असा आरोप केला. गटविकास अधिकारी राघवेंद्र घोरपडे यांना विचारले असता त्यांनी गटशिक्षण अधिकारी यांच्याकडे बोट दाखवत सांगितले की मी नवीन आहे.

टॅग्स :Teacherशिक्षकthaneठाणे