शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

गुन्ह्यांचे अर्धशतक पार करणाऱ्या तात्या पटेलला अखेर अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2018 20:18 IST

काशिमिरा पोलिसांना गेल्या आठ वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांचे अर्धशतक पार करणाऱ्या तात्या पटेल उर्फ अश्रफ गुलाम रसुल पटेल याच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी यश मिळाले.

 भार्इंदर - काशिमिरा पोलिसांना गेल्या आठ वर्षांपासून विविध गंभीर गुन्ह्यांचे अर्धशतक पार करणाऱ्या तात्या पटेल उर्फ अश्रफ गुलाम रसुल पटेल याच्या मुसक्या आवळण्यात गुरुवारी यश मिळाले. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या काशिमिरा युनिटच्या पथकाने अंधेरीच्या वर्सोवा परिसरातून अटक केली.

काशिमिरा परिसरात पटेल कुटूंबातील अनेक सदस्यांवर विविध प्रकारचे शतकाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांनी परिसरा दहशत निर्माण केली असुन त्यापैकी एक असलेल्या अश्रफ उर्फ तात्या याच्यावर हत्या करणे, हत्येचा प्रयत्न करणे, बोगस कागदपत्राद्वारे धमकी देऊन अनेकांच्या जमिनींवर जबरदस्ती कब्जा करणे, खंडणी उकळणे, बेकायदा शस्त्रे बाळगणे आदी अर्ध शतकाहून अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याने गेल्या सप्टेंबर २०१७ मध्ये काशिमिरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हाटकेश परिसरात राहणाय््राा नझमा शकील अहमद पटेल या महिलेला जमिन बळकावण्याच्या वादातून जीवंत जाळण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी त्याच्यावर काशिमिरा पोलिस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यापुर्वी त्याने आपल्या अंगरक्षकाची गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर तो ४ वर्षे फरार झाला होता. पोलिसांनी त्याच्यावर मकोका लावला होता. त्याला जेरबंद करण्यासाठी पोलिसांनी अनेकदा सापळे रचले. परंतु, तो पोलिसांच्या हातावर तूरी देऊन पसार होत असे. तो गोरेगाव परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी तेथे सापळा लावताच तो एका अलिशान कारमध्ये फिरत असताना पोलिसांनी त्याच्यावर झडप घालून मे २०११ मध्ये अटक केली होती. पोलिसांच्या हाती लागलेला तात्या गेल्याच वर्षी जामिनावर सुटला होता. त्यांनतरही त्याने आपली गुंडगिरी सुरुच ठेवल्याने पोलिसांनी पुन्हा त्याच्यावर मकोका लावला. त्याच्या शोधासाठी ठाणे ग्रामीण पोलिस अधिक्षक डॉ. महेश पाटील यांनी शोधपथके तयार केली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांना तात्या अंधेरी येथील वर्सोवा परिसरात असल्याची माहिती मिळाली होती. आंधळे व सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी त्याच्यावर पाळत ठेवली असता त्याला गुरुवारी जेरबंद करण्यात आले. महिलेच्या हत्येच्या प्रयत्नात आणखी दोन आरोपींचा समावेश असुन सध्या ते फरार आहेत. पोलिस त्यांच्याही शोध घेत असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Crimeगुन्हाMira Bhayanderमीरा-भाईंदर