तारिक परवीनला जामीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 05:28 IST2018-05-09T05:28:58+5:302018-05-09T05:28:58+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला देश सोडून न जाण्याच्या मुख्य अटीवर मंगळवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंब्रा येथील खून प्रकरणात गेल्या महिन्यात त्याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.

तारिक परवीनला जामीन
ठाणे - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा हस्तक तारिक परवीन याला देश सोडून न जाण्याच्या मुख्य अटीवर मंगळवारी ठाणे न्यायालयाने जामीन मंजूर केला. मुंब्रा येथील खून प्रकरणात गेल्या महिन्यात त्याला ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली होती.
व्यावसायिक स्पर्धेतून ३१ आॅगस्ट १९९८ रोजी मुंब्रा येथील केबल व्यावसायिक मोहम्मद सिद्दीकी मोहम्मद उमर बांगडीवाला यांचा भाऊ मोहम्मद इब्राहिम यांची एका टोळीने गोळ्या झाडून हत्या केली होती. ]
मुंब्रा पोलिसांनी याप्रकरणी तारिक परवीनसह सात आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल केला होता. तारिक वगळता सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. न्यायालयाने त्यांची निर्दोष सुटकादेखील केली होती. या घटनेला जवळपास २० वर्षे उलटल्यानंतर ठाण्याच्या खंडणी विरोधी पथकाने २६ एप्रिल रोजी तारिकला मुंबईतील एल.टी. रोडवरील अशोका शॉपिंग सेंटरमधून अटक केली. ठाणे न्यायालयाने त्याला १ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती.