शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कल्याणमधील चोरटय़ांनी केले पत्रकाराला लक्ष्य, एक लाखाची रोकड व कॅमेरे लांबवले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2017 17:53 IST

कल्याण शहराच्या पश्चिम भागातील आर्चिच गॅलरीजवळ चोरटय़ांनी पत्रकार संदेश शिर्के यांना गाडी समोर काही तरी पडले असल्याचा बनाव करुन त्यांना बोलण्यात गंगवून त्यांच्या गाडीतील एक लाख रुपये व कॅमेरा असा 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे.

कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील आर्चिच गॅलरीजवळ चोरटय़ांनी पत्रकार संदेश शिर्के यांना गाडी समोर काही तरी पडले असल्याचा बनाव करुन त्यांना बोलण्यात गंगवून त्यांच्या गाडीतील एक लाख रुपये व कॅमेरा असा 1 लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबवला आहे. ही घटना शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिर्के यांनी महात्मा फुले पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिस त्याचा तपास करीत आहेत. शिर्के हे बातमीदार डॉटकॉम नावाचे स्थानीक चॅनल चालवितात. तसेच ते साम टिव्ही व टाईम्स नाऊसाठी बातम्या देतात. काल ते एअरटेल गॅलरीत पैसे भरण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी गॅलरी बंद असल्याने ते पुढच्या गॅलरीत गेले. त्याठिकाणाहून परत येत असताना रस्त्यावर फेरीवाल्यांकरीता जे पट्टे मारले आहे. हे पाहून ते फेरीवाल्यांकडे विचारपूस करण्यासाठी गाडीतून उतरले. पुन्हा ते गाडीजवळ आले. त्यांनी गाडीचे दार उघडले. तेव्हा बाहेरून एका माणसाने त्यांच्या गाडीच्या दादावर जोराने टकटक केले. तेव्हा शिर्के यांनी काय झाले अशी विचारणा केली. त्यावेळी त्यांनी गाडीसमोर काय पडले आहे ते पहा. तेव्हा शिर्के यांना वाटले की, गाडीला ज्ॉमर लावल्याचा संशय आला. ते खाली उतरले. इतक्यात चोरटय़ाने संधी साधून मागच्या डोरमधून मागच्या सिटवर असलेला शिर्के याचा व्हीडीओ कॅमेरा, दोन स्टिंग ऑपरेशनचे इम्पोर्टेड कॅमेरे आणि एक लाखाची रोकड असा एक लाख 72 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. एका क्षणात हा प्रकार घडला. गाडीचा मागचा डोर उघडा असल्याने शिर्के यांची लूट झाल्याचे कळाले. त्यांनी तातडीने महात्मा फुले पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा तपास सुरु केला आहे. गुन्हे शाखेकडे हा तपास देण्यात आला आहे. हा प्रकार ज्याठिकाणी घडला. त्याठिकाणी असलेल्या दुकानदारांचे सीसीटीव्ही फूटेज तपासण्यात येणार आहे. कल्याण शहरात चोरटय़ांनी धुमाकूळ घातला असून आत्ता त्यांनी चक्क पत्रकारांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे या प्रकरणाचा जलदगतीने तपास करावा अशी मागणी पत्रकारांनी केली आहे. 

टॅग्स :Crimeगुन्हाkalyanकल्याण