तारापूर : अपघातात दोघांचा मृत्यू

By Admin | Updated: December 25, 2015 02:02 IST2015-12-25T02:02:58+5:302015-12-25T02:02:58+5:30

तारापुर एमआयडीसी मध्ये बुधवारच्या मध्यरात्री व आज सकाळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात एक महिला व एक तरूण अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे

Tarapur: The death of both in the accident | तारापूर : अपघातात दोघांचा मृत्यू

तारापूर : अपघातात दोघांचा मृत्यू

बोईसर : तारापुर एमआयडीसी मध्ये बुधवारच्या मध्यरात्री व आज सकाळी अशा दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या रस्ते अपघातात एक महिला व एक तरूण अशा दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
मध्यरात्री दिडच्या सुमारास मोटार सायकलवरून परतणाऱ्या रविशंकर पाठकला खड्ड्याचा अंदाज न आल्याने घसरून झालेल्या अपघातामुळे तो जागीच मृत्यू पावला. तर डबलकोला कंपनीच्या समोरून जाणाऱ्या रस्त्यावरून एक डंपरने होंडा शाईन या मोटार सायकलला मागून धडक दिल्याने मोटार सायकल चालकाचा बॅलन्स जाऊन मागील सीटवर बसलेली शिक्षा अरविंद्र तोडीयाल (२६) ही महिला खाली पडली व तीच्या डोक्यावरून डंपर गेल्याने तीचाही जागीच मृत्यू झाला आहे. यामुळे जनतेत संताप असून असे अपघात टाळण्यासाठी त्वरीत कारवाई व्हावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)

Web Title: Tarapur: The death of both in the accident