ट्रेलर चालकाची पोलिसाला धक्काबुक्की
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2017 03:28 IST2017-07-31T03:28:48+5:302017-07-31T03:28:48+5:30
कळवा नाका येथे रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा करून, वाहतूककोंडी करणाºया चालकाला जाब विचारल्याचा राग आल्याने, त्याने वाहतूक पोलीस हवालदार शिवाजी मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की

ट्रेलर चालकाची पोलिसाला धक्काबुक्की
ठाणे : कळवा नाका येथे रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा करून, वाहतूककोंडी करणाºया चालकाला जाब विचारल्याचा राग आल्याने, त्याने वाहतूक पोलीस हवालदार शिवाजी मोरे यांनाच शिवीगाळ करून धक्काबुक्की केल्याचा प्रकार शनिवारी घडला. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पसार झालेल्या चालकाचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.
कळव्याच्या गॅमन टी जंक्शन येथे २९ जुलै रोजी सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार मोरे हे वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्याच वेळी एका चालकाने रस्त्याच्या मधोमध ट्रेलर उभा केला. त्यामुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे या चालकाला मोरे यांनी समजविण्याचा प्रयत्न केला. त्याने मात्र, त्यांची कॉलर पकडून शिवीगाळ करीत त्यांना धक्काबुक्की केली. शासकीय कामातही त्याने अडथळा निर्माण केला. या सर्व धुमश्चक्रीत पोलीसमित्र सुरेश जाधव हेही गाडीच्या धक्क्याने जखमी झाले. या घटनेनंतर या अनोळखी ट्रेलरचालकाने पलायन केले असून, त्याचा शोध सुरू असल्याचे पोलीस उपनिरीक्षक गणेश मुघले यांनी सांगितले.