चार दिवसांपासून नळ बंद, शंभर रूपये बॅरल पाणी

By Admin | Updated: February 24, 2016 03:05 IST2016-02-24T03:05:50+5:302016-02-24T03:05:50+5:30

दळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने

Taps closed for four days, one hundred rupees barrel water | चार दिवसांपासून नळ बंद, शंभर रूपये बॅरल पाणी

चार दिवसांपासून नळ बंद, शंभर रूपये बॅरल पाणी

- मनीष दोंदे,  खर्डी
दळखण गावाकरीता पाणीपुरवठा जलस्वराज पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समितीमार्फत केला जातो. भातसा नदीच्या पात्रातून पाणी उचल करणाऱ्या पंपाच्या मोटारीमध्ये बिघाड झाल्याने गेल्या चार दिवसा पासून गावात पाणीपुरवठा होत नाही. मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्व मोठी धरणे शहापूर तालुक्यात आहे. परंतु, धरण उशाशी असतांनाही खर्डी नजिकच्या दळखण गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत असून शंभर रूपये बॅरल प्रमाणे त्यांना पाणी विकत घ्यावे लागत आहे.
गावातील विहीरीमध्ये पाणी आहे. परंतु, नळ असल्याने ते भरण्यासाठी विहीरीवर सहसा कोणी जात नाही. मात्र, गेले चार दिवस नळ बंद असल्याने विहीरीवर पाणी भरण्यासाठी तुडुंब गर्दी पाहवयास मिळत आहे. त्यात विहीरीचेही पाणी तळाला गेल्याने येथिल ग्रामस्थांना पाणी विकत घेण्याशिवाय पर्याय राहीला नाही. सध्या एक बॅरलला शंभर रु पये मोजावे लागत आहेत. यामुळे ग्रामस्थांत तीव्र संताप व्यक्त होत असून त्याचा कधीही उद्रेक होण्याची भीती आहे.

नदीच्या पाण्याची पातळी घटली असून पाणी खेचणाऱ्या पंपाची मोटर नादुरु स्त झाली आहे. दुरु स्ती साठी नाशिक येथे नेली होती. त्यामुळे चार दिवस पाणीपुरवठा बंद होता. मात्र लवकरच तो पूर्वरत होईल.
- गजानन सरखोत, अध्यक्ष, जलस्वराज्य पाणीपुरवठा व ग्राम स्वच्छता समिती, दळखण.

Web Title: Taps closed for four days, one hundred rupees barrel water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.