शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वरसावे वाहतूक पुलाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर पलटला, वाहतुकीची प्रचंड कोंडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 16:48 IST

मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला.

भार्इंदर - मीरा-भार्इंदर पालिका हद्दीतील वरसावे वाहतूक बेटाजवळ एलपीजी गॅसने भरलेला टँकर गुरुवारी दुपारी 12.20 वाजताच्या सुमारास पलटला. टँकरमधील गॅस गळती होऊ लागल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून रस्त्याच्या दुतर्फा वाहतूक खंडित करण्यात आली. यात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे अग्निशमन दलाचे उपायुक्त दीपक पुजारी यांनी सांगितले.एलपीजी गॅसने भरलेला टँकर मुंबई-अहमदाबाद मार्गावर पलटल्यानं वाहतुकीची मोठी कोंडी झाली आहे. या अपघातात सुदैवाने त्याच्या आसपास कोणतीही वाहने तसेच माणसे नसल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु टँकरमधील गॅस गळती झाल्याचे लक्षात येताच तेथील वाहतूक कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखून रस्त्याच्या दुतर्फा सुमारे दीड तास वाहतूक रोखून धरली. घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमनचे अधिकारी, उपायुक्त व जवानांसह फायर व वॉटर गाड्या काही वेळेतच घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी परिसरात मोबाईल फोनचा वापर करण्यास मनाई करून टँकर व गळती झालेल्या गॅसवर पाण्याचा फवारा मारण्यास सुरुवात केली. 

उपायुक्तांनी घटनेची माहिती भारत पेट्रोलियम कंपनीला दिल्यानंतर कंपनीने एका रिकाम्या टँकरसह विशेष पथक घटनास्थळी रवाना केले. दीड तासानंतर नवीन वरसावे खाडी पुलावरुन प्रत्येकी १० मिनिटांच्या अंतराने दोन्ही बाजूंकडील वाहतूक सुरू केली. दरम्यान या दुर्घटनेमुळे घोडबंदर मार्गासह, वसई-विरार व मीरा-भार्इंदर महापालिका हद्दीतील महामार्ग क्र. ८ वर प्रचंड वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. अतिरीक्त पोलिस अधिक्षक प्रशांत कदम यांनी स्वत: उपस्थित राहून तेथील घटनेवर नियंत्रण ठेवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे उपायुक्तांनी सांगितले.वरसावे पुलावरच्या वाहतुकीच्या मार्गात केला बदलठाणे ग्रामीण पोलिसांनी वाहन चालकांना वरसोवा मार्गे न जाण्याचा आवाहन केलं आहे. तसेच मुंबईहून गुजरातला जाणा-या मार्गांतही बदल करण्यात आले आहेत. मुंबईकडून काशिमीरा मार्गे गुजरातकडे जाणारे वाहन नाशिक रोडहून भिवंडी मार्गे गुजरात जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. त्याप्रमाणेच ठाणे घोडबंदरकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहन नाशिक हायवे-भिवंडीमार्गे गुजरातला जाण्याची सूचनाही करण्यात आली आहे. ठाण्याहून घोडबंदर मार्गे मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांनाही मुलुंड - घाटकोपर मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे. ठाणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी वाहन चालकांना हे आवाहन केलं आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर