शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत गावठी दारू हातभट्ट्यांवर तालुका पोलिसांची कारवाई

By नितीन पंडित | Updated: March 3, 2023 17:09 IST

वडूनवघर गावच्या हद्दीतील फिरींगपाडा खाडी किनारी झाडा झुडपात असलेल्या दोन गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाई करीत सुमारे १५० लिटर गावठी दारुसह काळा गूळ, नवसागर व इतर रसायन असा १ लाख ९५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे. 

भिवंडी - गावठी दारू विक्री बंदी असतानाही भिवंडीतील ग्रामीण भागात गावठी हातभट्टी दारू मोठ्या प्रमाणात बनवली जात असल्याची गुप्त माहिती तालुका पोलिसांना मिळतात भिवंडी तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे व सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने गुरुवारी वडूनवघर गावच्या हद्दीतील फिरींगपाडा खाडी किनारी झाडा झुडपात असलेल्या दोन गावठी दारू हातभट्ट्यांवर कारवाई करीत सुमारे १५० लिटर गावठी दारुसह काळा गूळ, नवसागर व इतर रसायन असा १ लाख ९५ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी नष्ट केला आहे. 

वडू नवघर फिरिंग पाडा खाडी किनाऱ्यालगत मोठ्या प्रमाणात गावठी दारूच्या भट्ट्या लावण्यात येत असतात या हातभट्ट्यांची खबर भिवंडी तालुका पोलिसांना मिळाली होती गुरुवारी सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांनी आपले सहकारी पोलीस हवालदार आंभुरे ,पो हवालदार कोळी ,पोलीस नाईक मोरे,पोलीस नाईक दामू पवार ,पोलीस शिपाई भामरे, पवार यांना सोबत घेऊन दोन्ही गावठी दारू हातभट्ट्या उध्वस्त करत दोन्ही ठिकाणाहून सुमारे ७० ड्रम गावठी दारूचे रसायन नष्ट केले. या हातभट्ट्या खाडीकिनारी झाडाझुडपात असल्याने तालुका पोलिसांनी गुडघाभर चिखलातून प्रवास करून या गावठी हातभट्ट्यांवर कारवाई केली. या कारवाईदरम्यान सहाय्य पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती तालुका पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोराटे यांनी दिली आहे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस