चिमुकल्याच्या अपहरणकर्त्यांवर कठोर कारवाई करा - डॉ. गोऱ्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 23:43 IST2020-09-28T23:43:46+5:302020-09-28T23:43:59+5:30
अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंडमधील एका अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार १५ सप्टेंबर २०२० रोजी भरदिवसा घडला होता.

चिमुकल्याच्या अपहरणकर्त्यांवर कठोर कारवाई करा - डॉ. गोऱ्हे
अंबरनाथ : अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करून त्याची ७० हजारांत विक्री करण्याच्या प्रकरणाची दखल विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोºहे यांनी घेतली असून, ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना पत्र पाठवून अपहरण प्रकरणात पकडलेल्या आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांना दिले आहेत.
अंबरनाथ येथील सर्कस ग्राउंडमधील एका अडीच वर्षांच्या मुलाचे अपहरण करण्याचा प्रकार १५ सप्टेंबर २०२० रोजी भरदिवसा घडला होता. याबाबाबत संबंधित मुलाच्या पालकांनी अंबरनाथ पोलिसांत मुलगा हरवल्याची तक्रार दाखल केली होती. अंबरनाथ पोलिसांनी तातडीने तपास करून २४ सप्टेंबर रोजी या घटनेतील पाच आरोपींना अटक केली. संबंधित मुलाला ताब्यात घेऊन त्याला त्याच्या पालकांकडे सुपूर्द केले.