शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
4
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
5
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
6
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
7
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
8
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
9
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
10
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
11
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
12
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
13
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
14
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
15
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
16
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
17
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
18
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
19
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
20
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा मग सत्तेचे दावे करा; भाजपाचे शिवसेनेला आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2020 20:31 IST

Pratap sarnaik, Geeta jain: आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती .

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपाच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे केवळ आरोपच शिवसेना करत असून त्यांना एकही भ्रष्टाचार सिद्ध करता आला नाही . पालिकेत सत्ता आणण्याचे दावे करण्या आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा. राज्यात तुमची सत्ता आहे ना , मग कोणी भ्रष्टाचार केला याची लावा चौकशी असे थेट आव्हानच भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी शिवसेनेला दिले आहे . 

 

आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व आ. गीता यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती . त्यावेळी आ. सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपाने मोठा भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप करत त्यांनी बीएसयुपी योजना कामाची निविदा , उद्याने आदी देखभालीसाठी ठेक्याने देण्याचे  काम, परिवहन ठेक्यातील गैरप्रकार आदींची उदाहरणे त्यांनी दिली होती . तर आ. गीता जैन यांनी शहरात एका व्यक्तीचा विकास झाला असा आरोप करत भाजपाला शहरात चांगली लोकं नको आहेत असे सांगत टीकेची झोड उठवली होती . 

 

त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली . यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते . म्हात्रे यांनी आ . गीता जैन यांच्यावर टीकेची उडवली . गीता जैन ह्या भाजपच्या महापौर होत्या त्या काळात पण भ्रष्टाचार झाला का ? त्या म्हणतात भाजपाच्या सत्ता काळात विकास झाला नाही मग त्या महापौर असताना शहरासाठीच्या १३५ दशलक्ष लिटर पाणी योजनेचे उदघाटन झाले , सिमेंट रस्त्यांसाठी निधी मिळाला आदी विकास कामे झाली नाहीत का ? असे सवाल म्हात्रे यांनी केले . 

 

राज्यात भाजपाची सत्ता येणार म्हणून त्या पुन्हा भाजपा सोबत आल्या होत्या आणि प्रदेश नेतृत्वाशी संपर्कात होत्या . स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही . त्या भाजपा सोबत होत्या म्हणतात तर महापौर निवडणुकीत अक्षाच्या विरोधात मतदान कसे केले ? त्यांच्या सोबत एकही नगरसेवक शिवसेनेत गेला नसून अश्विन कसोदरिया , विजय राय यांनी सभापती निवडणुकीत भाजपलाच मतदान केले आहे . तर अन्य कार्यकर्ते देखील मला भेटून बोलले कि आम्ही भाजपा सोबतच आहोत . 

 

शिवसेनेचे प्रताप सरनाईक हे गेली १५ वर्षे आमदार आहेत . गेल्या १५ वर्षांचा त्यांचा रेकॉर्ड पाहता ते नुसते बोलतात . कोणी भ्रष्टाचार केला ? किती रकमेचा झाला ? कोणत्या खात्यात झाला ? . त्यांनी एकही भ्रष्टाचार सिद्ध केलेला नाही .  उंटावरून शेळ्या हाकत फालतूचे आरोप करायची सरनाईकांची सवय आहे .  आता राज्यात तुमची सत्ता आहे . मग चौकशी  लावा . जे भ्रष्टाचारी आहेत त्यांना सजा व्हावी असे आमचेपण म्हणणे आहे असे म्हात्रे म्हणाले .   

 

सरनाईक गेली १५ वर्ष आमदार असून देखील त्यांना पालिकेत शिवसेनेची सत्ता आणण्याचे सोडाच सत्तेच्या जवळ देखील पोहचता आले नाही . आधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा  . आत्ताच्या सभापती निवडणुकीला देखील सेनेच्या नगरसेविका दीप्ती भट गैरहजर होत्या . सेनेचे अनेक आजीमाजी नगरसेवक , पदाधिकारी भाजपात आले आहेत . आणखी देखील भाजपाच्या वाटेवर आहेत. सरनाईक हे शिवसेनेची सत्ता आणण्याचे पोकळ दावे गेल्या १५ वर्षां पासून करत आले आहेत असा टोला म्हात्रे यांनी लगावला . 

माजी आमदार नरेंद्र मेहता यांनी राजकारण सोडल्याचे जाहीर केले आहे. त्यांना समाजसेवा करायची असल्याने ते महापालिकेत येतात व महापौर, आयुक्तांना भेटत असतात असे भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे म्हणाले.

टॅग्स :pratap sarnaikप्रताप सरनाईकBJPभाजपाShiv SenaशिवसेनाMira Bhayanderमीरा-भाईंदर