शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

नगरसेवक सांभाळा, मग दावे करा, हेमंत म्हात्रे यांचे सेनेला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2020 01:07 IST

Mira Bhayander : सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते. 

मीरा राेड - मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्या काळात भ्रष्टाचार झाल्याचे केवळ आरोपच शिवसेना करत असून त्यांना एकही भ्रष्टाचार सिद्ध करता आलेला नाही. पालिकेत सत्ता आणण्याचे दावे करण्याआधी स्वतःचे नगरसेवक सांभाळा. राज्यात तुमची सत्ता आहे ना , मग कोणी भ्रष्टाचार केला, याची चौकशी करा, असे थेट आव्हान भाजपचे जिल्हाध्यक्ष हेमंत म्हात्रे यांनी दिले आहे.आमदार गीता जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर आमदार प्रताप सरनाईक व जैन यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी सरनाईक यांनी पालिकेत सत्ताधारी भाजपने भ्रष्टाचार चालवला असल्याचे आरोप केले होते. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हा उपाध्यक्ष अनिल भोसले उपस्थित होते. म्हात्रे यांनी जैन यांच्यावर टीका केली. जैन या भाजपच्या महापौर होत्या, त्या काळात पण भ्रष्टाचार झाला का? त्या म्हणतात भाजपच्या सत्ताकाळात विकास झाला नाही, मग त्या महापौर असताना शहरासाठीच्या १३५ दशलक्ष लीटर पाणीयोजनेचे उद्घाटन झाले, सिमेंट रस्त्यांसाठी निधी मिळाला आदी विकासकामे झाली नाहीत का? असे सवाल म्हात्रे यांनी केले आहे.  भविष्यात सेना-भाजपमध्ये विविध विषयांवरुन वाद हाेणार अशी चर्चा राजकीय क्षेत्रात सुरु झाली  आहे. 

राज्यात भाजपची सत्ता येणार म्हणून त्या पुन्हा आल्या होत्या. प्रदेश नेतृत्वाशी संपर्कात होत्या. स्थानिक पातळीवर जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी माझ्याशी संपर्क केला नाही. त्या भाजपसोबत होत्या म्हणतात, तर महापौर निवडणुकीत पक्षाच्या विरोधात मतदान कसे केले? त्यांच्यासोबत एकही नगरसेवक शिवसेनेत गेला नसून अश्विन कसोदरिया, विजय राय यांनी सभापती निवडणुकीत भाजपलाच मतदान केले आहे. त्यांनी सरनाईक यांच्यावरही टीका केली. सेनेचे अनेक आजीमाजी नगरसेवक, पदाधिकारी भाजपमध्ये आले आहेत. आणखीही भाजपच्या वाटेवर आहेत, असा दावा केला. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुकBJPभाजपाShiv Senaशिवसेना