तलावांमधील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्या- पालकमंत्र्यांचा आदेश
By Admin | Updated: September 11, 2015 23:18 IST2015-09-11T23:18:03+5:302015-09-11T23:18:03+5:30
जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्या पलिकडे जाऊन गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत
तलावांमधील गाळ काढण्याची मोहिम हाती घ्या- पालकमंत्र्यांचा आदेश
ठाणे: जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. त्या पलिकडे जाऊन गावतलावांमधील गाळ काढून पाणी साठवण्याची क्षमता वाढवल्यास जिल्हा पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होईलच तसेच अनेक छोटया गावांची पाण्याची समस्या दूर होण्यास मदत होतील, यासाठी धडक कार्यक्र माची मोहिम हाती घेण्याचे आदेश पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरु वारी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिले आहेत.
राज्यभरात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातही आतापासूनच पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज आहे. जिल्ह्यातील धरणांव्यतिरिक्त स्थानिक पातळीवर पाण्याच्या अन्य स्रोतांचाही शोध घ्यावे लागले, यासाठी पुढाकाराने कल्याण ग्रामीण येथील वाकळण तलावातील
गाळ काही महिन्यांपूर्वी काढल्याने तलावाचे क्षेत्र मोठे झाले आहे. त्यामुळेच यंदा तलावातील पाणीसाठा वाढला आहे.
त्यातून तेथील ग्रामस्थांनी २५ एकर क्षेत्रावर भाजीपाल्याचे पीक घेतले आहे, अशी माहिती या
बैठकीत देण्यात आली असता सर्वच गावतलावांमधील गाळ काढण्यासाठी धडक कार्यक्र म हाती घ्या,
त्यासाठी केवळ सरकारी निधीवर अवलंबून न राहाता सेवाभावी
संस्था, सीएसआर आदी पर्यायांचा अवलंब करा, स्थानिक लोकप्रतिनिधींची मदतीचा हात
पुढे करावा असे निर्देश
पालकमत्र्यांनी यावेळी दिले. (प्रतिनिधी)