'नुकसानभरपाई, कर्जमाफीसाठी लवकर कार्यवाही करा'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 22:26 IST2019-11-17T22:26:38+5:302019-11-17T22:26:50+5:30
अन्यथा आंदोलनाचा इशारा; भाजप पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना दिले निवेदन

'नुकसानभरपाई, कर्जमाफीसाठी लवकर कार्यवाही करा'
मोखाडा : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात भात शेतीचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी भाजपच्या पालघर जिल्हा पदाधिकाºयांनी तालुक्यातील विविध भागातील नुकसानग्रस्त शेतीची थेट बांधांवर जाऊन पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकºयांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी आणि कर्जमाफी करावी यासाठी मोखाडा तहसीलदारांना निवेदन दिले. याबाबत लवकर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही या निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
भाजपचे पालघर जिल्हा सरचिटणीस डॉ. हेमंत सवरा यांच्या नेतृत्वाखाली भाजप पदाधिकाºयांनी शनिवारी ही पाहणी केली. मुळातच या भागात खरीप हंगामा व्यतिरीक्त अन्य कोणतेही उत्पन्नाचे साधन नसल्याने, येथील शेतकºयांची उपासमार होणार आहे. त्यामुळे येथे तातडीने नरेगाची कामे सुरू करावीत. त्याचबरोबर पीककर्ज माफ करावे आणि नुकसानभरपाई मिळावी म्हणून आपण प्रयत्नशील असल्याचे डॉ. सवरा यांनी यावेळी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी आणि जिल्हा कृषी अधिकाºयांची भेट घेऊन, मंत्रालय स्तरावर भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी भाजपचे पालघर उपाध्यक्ष संतोष चोथे, युवा मोर्चा विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष उमेश येलमामे, मोखाडा तालुकाध्यक्ष रघुवीर डिंगोरे, शहर अध्यक्ष विलास पाटील, यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
शेतकºयांनी मांडल्या व्यथा
मोखाड्यातील अतिदुर्गम आणि शेवटचे टोक असलेल्या करोळ, वावळ्याची वाडी, पाचघर तसेच खोडाळा येथील आदिवासी शेतकºयांच्या पिकांच्या नुकसानीची पाहणी केली.