शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

'मेस्टा नावाचा गैरवापर करणाऱ्या 22 हजार शाळांविरोधात कारवाई करा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:12 IST

अध्यक्ष तायडे यांनी सांगितले की, मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांना २५ टक्के शुल्क सवलत दिली होती.

कल्याण- मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांनी १५ टक्के शुल्क कपात केली असल्यास त्यांच्या विरोधात सरकारने कारवाई करु नये असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र,ज्या शाळा मेस्टाशी संलग्न नाहीत, त्यांनीदेखील १५ टक्के कपात केली आहे. त्यांच्या विरोधातील सरकारी कारवाईपासून वाचण्याकरीता त्या मेस्टाच्या नावाचा गैरवापर करीत आहे. अशा शाळांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी मेस्टाचे अध्यक्ष डॉ. संजय तायडे यांनी केली आहे.महाराष्ट्र इंग्लीश स्कूल ट्रस्टीज असोशिएशनचे अध्यक्ष तायडे यांच्या उपस्थितीत आज नंदी पॅलेस हॉटेलमध्ये एक बैठक पार पडली. या बैठकीला इंग्रजी शाळांचे विश्वस्त उपस्थित होते. त्याचबरोबर प्रा. गजानन पाटील, राजेश उज्जैनकर, ठाणो जिल्हाध्यक्ष शीतल तेंबलकर, प्रा. के. एस. अय्यर आदी उपस्थित होते.

अध्यक्ष तायडे यांनी सांगितले की, मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांना २५ टक्के शुल्क सवलत दिली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार सरसकट १५ टक्के शुल्क कपात करण्यात आली. मात्र,मेस्टाने आधीच २५ टक्के शुल्क सवलत दिल्याने १५ टक्के शुल्क कपात मान्य नसल्याचे म्हटले होते. न्यायालयाने मेस्टाशी संलग्न असलेल्या शाळांविरोधात कारवाई केली जाऊ नये असे म्हटले आहे. राज्यभरात इंग्रजी माध्यमाच्या ४० हजार शाळा आहेत. त्यापैकी १८ हजार शाळा मेस्टाशी संलग्न आहे. ९ हजार शाळा बेकायदेशीर आहेत. त्यामुळे १८ हजार मेस्टा संलग्न शाळा वगळता अन्य २२ हजार शाळा या मेस्टीशी संलग्न नसताना संलग्न असल्याचे सांगून सरकारच्या कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यांच्या विरोधात कारवाई केली जावी अशी मागणी अध्यक्ष तायडे यांनी केली आहे.

काय आहेत मागण्या

इंग्रजी शाळांना स्वतंत्र संरक्षण कायदा करण्यात यावा. इंग्रजी माध्यमातील ५ आणि ८ वीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची रक्कम मिळत नाही. शाळेची आर्थिक परिस्थिती पाहता आरटीई विद्यार्थ्यांचा फी परतवा देण्यात यावा. इंग्रजी शाळांना मालमत्ता आणि वीज दर व्यावसायिक न आकारता सूट द्यावी. दोन वर्षापासून शाळा बंद आहे. त्यामुळे स्कूल बसेसचे आरटीओ शुल्क व सर्व कर माफ करण्यात यावेत. आरटीई प्रवेश शुल्क १७ हजार ६०० होते. त्यात कपात करुन ते ८ हजार केले आहे. सरकारने या संदर्भात काढलेले परिपत्रक रद्द करावे. 

टॅग्स :thaneठाणेenglishइंग्रजीSchoolशाळा