शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

पगारासाठी शिक्षकांची टीजेएसबी ‘शाखेत’ हजेरी

By admin | Updated: June 15, 2017 03:03 IST

नोटाबंदीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यातील भाजपा सरकारने घाईघाईने घेतलेल्या एका निर्णयाने धक्का बसला आहे

- नारायण जाधव। लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : नोटाबंदीमुळे आधीच कंबरडे मोडलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्यातील भाजपा सरकारने घाईघाईने घेतलेल्या एका निर्णयाने धक्का बसला आहे. जिल्ह्यातील अनुदानित खाजगी शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेऐवजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वर्चस्व असलेल्या ठाणे जनता सहकारी बँके (टीजेएसबी) मार्फत काढण्याचा फतवा जारी केला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ जुलै २०१७ पासून होणार असल्याने जिल्ह्यातील शिक्षकांना जून महिन्याच्या पगारासाठी टीजेएसबीच्या ‘शाखां’मध्ये हजेरी लावावी लागणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेसह शिक्षक संघटनांना विश्वासात न घेता घेतलेल्या या निर्णयामुळे शिक्षकवर्गात मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त करण्यात येत असून गृहकर्जासह त्यांच्या इतर हप्त्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार असल्याने त्याचे तीव्र पडसाद येत्या काळात उमटण्याची चिन्हे आहेत.शिक्षण विभागाने १४ जून २०१७ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ठाण्याच्या प्राथमिक व माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षकांच्या पगारासाठीचे मेन पूल अकाउंट ठाणे जनता सहकारी बँकेत तत्काळ उघडावे, असे बजावण्यात आले आहे.शिक्षण विभागाच्या या निर्णयामुळे ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील जिल्हाभरातील १२१८ शाळांमधील १८ हजार २७३ शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची खाती बंद होऊन त्यात दरमहा जमा होणारी ७० कोटींची उलाढाल थांबणार आहे. या निर्णयाबाबत टीडीसी बँकेला कोणतीही कल्पना देण्यात आलेली नाही. त्यामुळे त्या बँकेचे प्रशासनही अंधारात आहे. आता ही बँक खाती ठाणे जनता सहकारी बँकेत उघडली जाणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात बँक खाती अचानक बंद होणार असल्याने आधीच नोटाबंदीने हैराण झालेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँक व्यवस्थापनाची आपला डोलारा सांभाळताना चांगलीच दमछाक होणार आहे. नोटा बँकेत पडून- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर सुमारे ७६ कोटी ७८ लाख २७ हजार रुपयांच्या जुन्या पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेत पडून आहेत. त्या स्वीकारण्यास आरबीआयने नकार दिला असला, तरी त्यांच्या व्याजापोटीचा दररोज ८४ हजार २४० रुपये भुर्दंड या बँकेला सहन करावा लागत आहे. असे असताना आता पुन्हा शिक्षकांच्या पगाराचे व्यवहार बंद करण्याचा निर्णय घेऊन शिक्षण खात्याने या बँकेचे कंबरडेच मोडले आहे.