पालकांसह शेजाऱ्यांना मतदान हक्क बजावण्यास लावण्यासाठी ठाणेच्या विद्यार्थ्यांची शपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2019 05:56 PM2019-10-17T17:56:22+5:302019-10-17T17:59:46+5:30

मतदान जनजागृती अभियानांतर्गत या लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्र्थिनींनी गुरूवारी ही मतदान शपथ घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते

Sworn in students of Thane to force their neighbors to vote with their parents | पालकांसह शेजाऱ्यांना मतदान हक्क बजावण्यास लावण्यासाठी ठाणेच्या विद्यार्थ्यांची शपथ

मतदानाचा हक्क बजावण्यास लावणारच, अशा आशयाची शपथ विद्यार्थ्यांनी गुरूवारी घेतली

googlenewsNext
ठळक मुद्देआई..बाबा..काका..मावशी..आत्या..यांना २१ आॅक्टोबरला नक्की मतदानाला पाठवू विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्यास लावणारचतुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात

ठाणे : आई..बाबा..काका..मावशी..आत्या..यांना २१ आॅक्टोबरला नक्की मतदानाला पाठवू ,असे आश्वासन लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थांनी जिल्हा प्रशासनाला दिले. यासाठी या विद्यार्थ्यांनी शपथ घेऊन मतदानाचा हक्क बजावण्यास लावणारच, अशा आशयाची शपथ विद्यार्थ्यांनी गुरूवारी घेतली. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
          मतदान जनजागृती अभियानांतर्गत या लिटील फ्लॉवर शाळेतील विद्यार्थ्यांनी व विद्यार्र्थिनींनी गुरूवारी ही मतदान शपथ घेतली. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी वैदही रानडे, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी रेवती गायकर उपस्थित होते. यावेळी रानडे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हणाल्या की ‘लोकशाहीला बळकट करण्यासाठी मतदान करणे अनिवार्य आहे. मतदानाच्या दिवशी घरातील १८ वर्षांवरील सगळ्यांना मतदान करण्यासाठी प्रवृत्त करा. तुम्ही देशाचे उज्ज्वल भविष्य आहात. तुमचेही १८ वर्षे पूर्ण झाल्यावर मतदान करायला विसरू नका’, असा संवाद रानडे यांनी विद्यार्थ्यांशी साधला. यामुळे या निवडणुकीच्या मतदानाची टक्केवारी वाढण्यासह भविष्यातील सुज्ञ नागरिक म्हणून मतदान हक्क बजावण्याची बाळकडू या जनजागृती कार्यक्रमाव्दारे देण्यात आले.
...........
फोटो - १७ठाणे विद्यार्थी शपथ

Web Title: Sworn in students of Thane to force their neighbors to vote with their parents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.