ठाणे जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धाड; ६०० लिटर दारू मिश्रण जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 14, 2019 09:04 PM2019-10-14T21:04:23+5:302019-10-14T21:09:26+5:30

जिल्ह्यात तब्बल ५८ हजार २८६ रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू, विदेशी व गूळ मिश्रण जप्त केले आहे. जिल्हह्यात ठिकठिकाणच्या टालेल्या धाडीमध्ये १९ जाणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये काशिमीरा, भार्इंदर, नवघर, कल्याण, कुळगांवर, शहापूर आणि उत्तन आदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी गुन्हा नोंद झाला

Police raid on liquor dealers in Thane district; Seize 600 liter alcohol mixture | ठाणे जिल्ह्यातील दारू विक्रेत्यांवर पोलिसांची धाड; ६०० लिटर दारू मिश्रण जप्त

१२९ लिटर गावठी हात भट्टीची दारू आणि ४४ लिटर विदेशी दारू जप्त

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यातील ठिकठिकाणच्या १९ अवैध दारू विक्रेत्यांवर धाड६२४ लिटर गावठी दारू गाळण्याचे नवसागर व गुळाचे मिश्रण१२९ लिटर गावठी हात भट्टीची दारू आणि ४४ लिटर विदेशी दारू

ठाणे : निवडणुकीच्या या कालावधीत जिल्ह्यात शांतता व कायदा सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी पोलिस यंत्रणा जिल्ह्यात सतर्क झाली आहे. गेल्या दोन दिवसाच्या सुटीच्या कालावधीत ठाणे ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या १९ अवैध दारू विक्रेत्यांवर धाड टाकली. त्यात ६२४ लिटर गावठी दारू गाळण्याचे नवसागर व गुळाचे मिश्रण आणि १२९ लिटर गावठी हात भट्टीची दारू आणि ४४ लिटर विदेशी दारू जप्त केली आहे.
      जिल्ह्यात तब्बल ५८ हजार २८६ रूपये किंमतीची गावठी हातभट्टीची दारू, विदेशी व गूळ मिश्रण जप्त केले आहे. जिल्हह्यात ठिकठिकाणच्या टालेल्या धाडीमध्ये १९ जाणांवर गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये काशिमीरा, भार्इंदर, नवघर, कल्याण, कुळगांवर, शहापूर आणि उत्तन आदी पोलिस स्टेशनच्या हद्दीत प्रत्येकी गुन्हा नोंद झाला आहे. याशिवाय भिवंडीला सहा, मुरबाडला पाच, टोकावडे दोन आणि कसारा दोन ठिकाणी टाकलेल्या धाडीत गुन्हे नोंद करण्याची कारवाई ग्रामीण पोलिसांनी केली आहे. कसारा येथे दोन व उत्तनला एक जुगाराच्या केसेस दाखल करण्यात आल्या आहेत.

Web Title: Police raid on liquor dealers in Thane district; Seize 600 liter alcohol mixture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.