ओव्हरटेकच्या वादातून तलवारीने वार आणि लूट
By Admin | Updated: February 6, 2016 02:16 IST2016-02-06T02:16:03+5:302016-02-06T02:16:03+5:30
गाडी ओव्हरटेकच्या वादातून एका घरात घुसून केलेली मारहाण व लूटमार, तर घरातल्यांनी प्रतिकार करताना केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याप्रकरणी काशिमीरा

ओव्हरटेकच्या वादातून तलवारीने वार आणि लूट
मीरा रोड : गाडी ओव्हरटेकच्या वादातून एका घरात घुसून केलेली मारहाण व लूटमार, तर घरातल्यांनी प्रतिकार करताना केलेल्या तलवारीच्या हल्ल्यात एक जण जखमी झाल्याप्रकरणी काशिमीरा पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री काशी गावातील अंजुम पटेल याच्या शमीम बंगल्यात नयानगरचा सोनू ऊर्फ नवाज खान, नजीर इजाज, खलीप खान हे बळजबरी घुसले. त्यांनी दानीश कुरेशीला मारहाण करून १० तोळे सोन्याचे दागिने लुटून नेल्याची तक्र ार शमीम अंजुम पटेल हिने केल्याने तसा गुन्हा दाखल केला आहे.
तर, गाडी ओव्हरटेक करण्यावरून वाद झाल्याने जाब विचारण्यासाठी गेले असता अंजुम पटेलच्या सांगण्यावरून मुलगा आफताबने तलवारीने वार केल्याने पेश नवाज असरार हा जखमी झाला, तर अन्य लोकांना मारहाण केल्याने अंजुम, आफताबसह दानीश पटेल, अमन पटेल व हशीर पटेल यांच्याविरु द्ध गुन्हा दाखल करून अंजुमला अटक केली आहे.