शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

९०० कर्मचाऱ्यांवर कारवाईची तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 12:30 AM

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर : गुन्हेही दाखल करणार

ठाणे : वारंवार सूचना, पत्रव्यवहार करूनही निवडणूक प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाºया ठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतील तब्बल ९०० कर्मचाऱ्यांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे प्रथम प्रशिक्षणवर्गास हजर राहून दुसºया प्रशिक्षणवर्गास गैरहजर राहणाºया ९०० अधिकारी, कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची तयारी सुरू झाली आहे.

ठाणे जिल्ह्यात निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यानुसार, या कामासाठी शासकीय व निमशासकीय कर्मचाºयांना पाचारण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यात सहा हजार ४८८ मतदानकेंद्रे आहेत. या निवडणुकीच्या कामासाठी ५५ ते ६० हजार कर्मचाºयांची आवश्यकता होती. यामध्ये २०० व्हिडीओग्राफर्स, ७२ भरारी पथके, ८६७ झोनल अधिकारी व तेवढेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवणारे अधिकारी आहेत. त्यानुसार, या कर्मचाºयांना ईव्हीएम मशीन हाताळणे, निवडणूक प्रक्रिया सुरळीत व शांततेत पार पाडावी, यासह विविध गोष्टींची माहिती व प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने जिल्ह्यातील प्रत्येक निवडणूक निर्णय कार्यालयस्तरावर अधिकारी आणि कर्मचाºयांचे प्रशिक्षणवर्गांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये पहिल्या प्रशिक्षणवर्गास चांगला प्रतिसाद लाभला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या दुसºया प्रशिक्षणवर्गास अनेकांनी दांडी मारली होती. त्यामुळे अशा ९०० अधिकारी, कर्मचाºयांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याबरोबरच त्यांच्यावर प्रशासकीय कारवाईदेखील करण्यात येणार असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.

सबळ कारण दिलेल्यांचे आदेश रद्दठाणे जिल्ह्यातील १८ विधानसभा मतदारसंघांतून निवडणुकीच्या कामाचे आदेश रद्द करण्यासाठी सुमारे सात हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे दाखल झाले होते. त्यातील ५० टक्के अर्जांत अधिकारी आणि कर्मचाºयांनी वैद्यकीय कारणे दिली आहेत. त्यातील वैद्यकीय कारणांत तथ्य असलेल्या कर्मचाºयांचे आदेश रद्द करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील यांनी दिली.

टॅग्स :thane-acठाणे शहर