स्वप्नील जोशीसोबत रंगणार रविवारी गप्पाटप्पा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 23:50 IST2019-06-07T23:50:15+5:302019-06-07T23:50:32+5:30

मोगरा फुलला टीमसह धमाल चर्चा : सखींसाठी मेट्रो जंक्शन मॉल कल्याणमध्ये कार्यक्रम

Swapnil Joshi will play with Gossip on Sunday | स्वप्नील जोशीसोबत रंगणार रविवारी गप्पाटप्पा

स्वप्नील जोशीसोबत रंगणार रविवारी गप्पाटप्पा

ठाणे : प्रेमातील नाजूक नात्यांचा गुंफलेला गजरा म्हणजे ‘मोगरा फुलला’ हा चित्रपट आहे. यामध्ये अभिनेता स्वप्निल जोशी याची प्रमुख भूमिका असून, त्यांच्या आईची भूमिका नीना कुलकर्णी यांनी साकारली आहे. ‘लोकमत’तर्फे सखी मंच सदस्यांसाठी रविवारी (दि. ९) या चित्रपटातील कलाकारांशी गप्पाटप्पा हा खास शो आयोजिण्यात आला आहे. त्यामध्ये स्वप्निल जोशी, सई देवधर यांच्याशी सदस्यांना संवाद साधता येईल. हा चित्रपट १४ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

लोकमत सखी मंच, तर्फे गप्पाटप्पांचा कार्यक्रम ‘मोगरा फुलला’ आयोजिला आहे. मेट्रो जंक्शन मॉल हे या कार्यक्रमाचे पार्टनर आहे. श्रावणी देवधर दिग्दर्शित आणि जीसिम्स निर्मित हा चित्रपट आहे. जीसिम्सच्या अर्जुनसिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.

दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱ्याच वर्षांनंतर ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी यापूर्वी लपंडाव, सरकारनामा, लेकरू या अन्य मराठी चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे.

‘गप्पाटप्पा’चा खास शो
दिनांक : ९ जून २०१९
वेळ : ४ :३० ते ७.०० वाजेपर्यंत
स्थळ : मेट्रो जंक्शन मॉल पत्रीपूल कल्याण पू.
अधिक माहितीसाठी संपर्क : ९८७०९१२२३३
वन मिनिट गेम शोदेखील यावेळी घेण्यात येईल.

Web Title: Swapnil Joshi will play with Gossip on Sunday