अत्याचारी मित्र अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2018 02:26 IST2018-08-05T02:26:33+5:302018-08-05T02:26:39+5:30

एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी रूपेश मणेरा (२५, रा. अंजूरगाव, भिवंडी) या तिच्याच मित्राला अटक केली आहे.

Suspended Friends Attract | अत्याचारी मित्र अटकेत

अत्याचारी मित्र अटकेत

ठाणे : एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वागळे इस्टेट पोलिसांनी रूपेश मणेरा (२५, रा. अंजूरगाव, भिवंडी) या तिच्याच मित्राला अटक केली आहे. त्याला ८ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत. १ आॅगस्ट रोजी रात्री ८.३० च्या सुमारास त्याने तिला फोन करून ठाण्याच्या माजिवडा सिग्नल येथे बोलवून घेतले होते. त्यानंतर, ती बेपत्ता झाली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ए.एस. पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोद लबडे यांच्या पथकाने त्याला ३ आॅगस्ट रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास भिवंडीतून अवघ्या काही तासांमध्येच त्याला अटक केली.
दुचाकीवरून त्याने तिला त्याच्या माजिवडा येथील कार्यालयात नेले. तिथेच व त्यानंतरही २ आॅगस्ट रोजी पहाटे ३ वा.च्या दरम्यानही त्याने तिच्यावर अत्याचार केला.

Web Title: Suspended Friends Attract

टॅग्स :Arrestअटक