शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकांनी पकडलेला संशयित चोरटा पोलीस ठाण्यातून निसटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 22:21 IST

चोरीच्या आरोपातील संशयित चोरटयाला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली.

ठळक मुद्दे पाणी पिण्याच्या बहाण्याने केले पलायन शिवसेना नगरसेविका परिषा सरनाईकांची पोलीस आयुक्तांकडे तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: चोरीच्या आरोपातील संशयित चोरटयाला स्थानिक रहिवाशांनी वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर चौकशीदरम्यान पाणी पिण्याचा बहाणा करीत त्याने पलायन केल्याची घटना नुकतीच घडली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्नी नगरसेविका परिषा सरनाईक यांनी पोलीस आयुक्त जयजित सिंह यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.वर्तकनगर परिसरात गेल्या दोन वर्षांपासून महानगर गॅसची जोडणी सुरू आहे. गॅसच्या मीटर रिडींगच्या बहाण्याने खोटे ओळखपत्र दाखवून घरामध्ये शिरून चोरी करणे किंवा एटीएम कार्ड चोरून एटीएममधून पैसे काढणे, असे प्रकार या भागात घडले आहेत. बहुतांश घरांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिला असल्यामुळे अशा प्रकारामुळे येथील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. या परिसरातील दक्ष नागरिकांनी प्रमोद मयेकर (४७, रा. मुंबई) या संशयित आरोपीला १७ आॅगस्ट २०२१ रोजी दुपारी पकडून वर्तकनगर पोलिसांच्या हवाली केले होते.मात्र, चौकशी दरम्यान त्याने पाणी पिण्याचा बहाणा करीत पोलिसांच्या हातावर तुरी देत पलायन केले. दरम्यान, या संशयितावर कोणतीही कारवाई न करता पोलिसांनी कसे काय सोडून दिले? पोलीस असे बेजबाबदार कसे वागू शकतात? असा सवाल करीत याप्रकरणी चौकशीची मागणी नगरसेविका सरनाईक यांनी पोलीस आयुक्तांकडे पत्राद्वारे केली आहे. 

* प्रमोद या संशयिताला नागरिकांनी पोलीस ठाण्यात आणले होते. त्याच्या आधारकार्डद्वारे पडताळणी केली जात होती. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झालेला नव्हता. चौकशी दरम्यान पाणी पिण्याच्या बहाण्याने पलायन केले. त्याच्याविरुद्ध १७ आॅगस्ट रोजी रात्री चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याने एटीएम कार्ड चोरुन ३५ हजार रुपये लुबाडल्याचा संशय असल्याने त्याचा कसून शोध घेण्यात येत आहे.संतोष घाटेकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वर्तकनगर पोलीस ठाणे. 

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारीtheftचोरी