सुनील तटकरे तिसऱ्यांदा गैरहजर
By Admin | Updated: September 22, 2015 01:58 IST2015-09-22T01:58:20+5:302015-09-22T01:58:20+5:30
राज्यातील सिंचन घोटाळ््याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने

सुनील तटकरे तिसऱ्यांदा गैरहजर
ठाणे : राज्यातील सिंचन घोटाळ््याच्या चौकशीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व तत्कालीन जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी तिसऱ्यांदा चौकशीसाठी पाचारण केले होते. मात्र, या चौकशीला न जाता त्यांनी पुन्हा एकदा सहायक वकिलामार्फत काही लेखी माहिती सादर केली. तसेच आणखी तपशील देण्यासाठी गणेशोत्सवानंतरची तारीख द्यावी, अशी विनंती त्यांनी ठाणे एसीबीकडे केली आहे.
सुनील तटकरे आणि तत्कालीन जलसंपदामंत्री अजित पवार यांच्या सिंचन घोटाळ्यातील सहभागाबाबत खुल्या चौकशीचे आदेश फडणवीस सरकारने नऊ महिन्यांपूर्वी ठाणे एसीबीला दिले होते. त्यानुसार, एसबीने चौकशी सुरू केली असून या प्रकरणाशी संबंधित सुमारे ९० हजारांहून अधिक दस्तावेज आपल्या ताब्यात घेतले आहेत.
तटकरे यांना यापूर्वी १७ आॅगस्ट आणि १५ सप्टेंबर रोजी समन्स बजावण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या वतीने सहाय्यक अॅड. चौगुले एसीबीसमोर हजर झाले होते. (प्रतिनिधी)