सुनेचा सासूला ७५ हजारांचा चुना

By Admin | Updated: December 22, 2016 06:12 IST2016-12-22T06:12:05+5:302016-12-22T06:12:05+5:30

कोपरीतील एका सुनेने आपल्या सासूला गावी पाठवण्याचा हट्ट पतीकडे धरून त्याला चक्क मारहाण केली. केवळ एवढ्यावरच

Sunele's mother-in-law selected 75,000 | सुनेचा सासूला ७५ हजारांचा चुना

सुनेचा सासूला ७५ हजारांचा चुना

ठाणे : कोपरीतील एका सुनेने आपल्या सासूला गावी पाठवण्याचा हट्ट पतीकडे धरून त्याला चक्क मारहाण केली. केवळ एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाहीतर तिने सासूच्या निवृत्ती पेन्शनच्या बँक खात्यातून ७५ हजार रुपये परस्पर हडप केल्याची तक्रार कोपरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.
मंजूषा महेशगिरी गोसावी (२९) असे या सुनेचे नाव असून तिचे पती महेशगिरी यांनी तिच्याविरुद्ध ही तक्रार दाखल केल्याने पोलीसही अवाक झाले. आपल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, त्यांच्या पत्नीने नेहमीच मानसिक त्रास दिला. आईला गावी पाठवण्यासाठी हट्ट केला. आपला हक्क तो पुरवत नसल्यामुळे तिने चक्क मलाच मारहाण केली. त्यानंतर, तिने सासू आणि पतीच्या नावावर असलेली मालमत्ता आपल्या (स्वत:च्या) नावावर करण्याचा आग्रह धरला. तो पूर्ण केला नाही, तर आत्महत्या करण्याची धमकी दिली. शिवाय, परिसरात बदनामी करण्याचाही इशारा दिला. तत्पूर्वी ८ जून २०१६ रोजी सासूच्या बँक खात्यातील ७५ हजार स्वत:च्या बँक खात्यात धनादेशाद्वारे तिने वळते केले. हे करताना तिने धनादेशावर सासूची बनावट स्वाक्षरी केली. पैशांचाही अपहार करून पुन्हा पती आणि सासूलाच धमकावले. (प्रतिनिधी)

Web Title: Sunele's mother-in-law selected 75,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.