पोलिसात तक्रार दिली म्हणून सुनेवर वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:42 IST2021-05-11T04:42:46+5:302021-05-11T04:42:46+5:30

कल्याण: मारहाणप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून रागाच्या भरात सासू आणि नणंदेने विवाहितेच्या गळ्यावर सुरीने वार ...

Sune was attacked as he lodged a complaint with the police | पोलिसात तक्रार दिली म्हणून सुनेवर वार

पोलिसात तक्रार दिली म्हणून सुनेवर वार

कल्याण: मारहाणप्रकरणी सासरच्या मंडळींविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हणून रागाच्या भरात सासू आणि नणंदेने विवाहितेच्या गळ्यावर सुरीने वार करून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना पूर्वेकडील काटेमानिवली परिसरात शुक्रवारी मध्यरात्री घडली. सासरच्या चौघा मंडळींविरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जखमी विवाहितेवर केडीएमसीच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

काटेमानिवली येथील वैकुंठधाम इमारतीत राहणाऱ्या गरीमा पांडे (वय २७) हिने तिला झालेल्या मारहाणप्रकरणी पती हिमांशू, सासरे राम उजागर आणि सासू आरती यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी तक्रार दिली होती. याचा राग आल्याने सासू आरती आणि नणंद शिखा या दोघींनी रात्री दोनच्या सुमारास गरीमाला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. `तू कायमची माहेरी निघून जा`, असे बोलून तिच्याशी वाद घालायला सुरुवात केली. वाद विकोपाला गेल्यावर आरतीने स्वयंपाक घरातील भाजी कापण्याची सुरी आणली आणि नणंद शिखा हिने गरीमाचे पाय धरले आणि तिच्या गळ्यावर आरतीने सुरीने वार करीत जखमी केले. आरती आणि शिखासह पती हिमांशू आणि सासरे राम उजागर यांच्याविरोधातही गुन्हा नोंद झाला आहे.

------------------------------------------------------

वाचली

Web Title: Sune was attacked as he lodged a complaint with the police