तरुणीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:07 IST2021-05-05T05:07:00+5:302021-05-05T05:07:00+5:30

------------------------------------------------------ रिक्षाची चोरी डोंबिवली : पूर्वेकडील खंबाळपाड्यातील विजय निवास येथे राहणारे विजय फर्डे यांनी त्यांची रिक्षा २१ एप्रिलला ...

Suicide of a young woman | तरुणीची आत्महत्या

तरुणीची आत्महत्या

------------------------------------------------------

रिक्षाची चोरी

डोंबिवली : पूर्वेकडील खंबाळपाड्यातील विजय निवास येथे राहणारे विजय फर्डे यांनी त्यांची रिक्षा २१ एप्रिलला सकाळी ११ वाजता आयप्पा मंदिराजवळ पार्क केली होती. तेथून ती चोरीला गेली आहे. या प्रकरणी रिक्षाचालक फर्डे यांच्या तक्रारीवरून टिळकनगर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

---------------------------------------------------

कल्याण-डोंबिवलीत ५६८ रुग्णांची भर

कल्याण : कल्याण डोंबिवलीत मंगळवारी नव्या ५६८ कोरोना रुग्णांची भर पडली. २४ तासांत तब्बल एक हजार ८५४ रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला. सद्य:स्थितीला आठ हजार ६३४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजमितीला केडीएमसीच्या हद्दीत एक लाख २३ हजार ३४१ रुग्ण आढळले असून, एक हजार ४७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर एक लाख १३ हजार २३४ इतके रुग्ण बरे झाले आहेत.

-------------------------------------------------

पर्यावरणपूरक पालखी सोहळा

डोंबिवली : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आई गावदेवीचा उत्सव साजरा करण्यावर मर्यादा आल्या असताना आई गावदेवी मातेच्या पालखी सोहळ्यानिमित्ताने एम. बी. ग्रुप व ग्रामस्थ मंडळ देवीचा पाडा यांच्या वतीने एक झाड लावून पर्यावरणपूरक पालखी सोहळा साजरा करण्यात आला. देवीचा पाडा खाडीकिनारी हे वृक्षारोपण करण्यात आले. यात एम. बी. ग्रुपचे नितीन म्हात्रे, समीर भोईर, विजय भोईर, समाजसेवक गोरखनाथ (बाळा) म्हात्रे यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी सहभाग घेतला होता.

------------------------------------------------------

Web Title: Suicide of a young woman