सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:45 IST2021-08-28T04:45:07+5:302021-08-28T04:45:07+5:30

ठाणे : ठाण्यातील प्रीती शिवकुमार जैयस्वाल (३५, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची ...

Suicide of a married woman due to her father-in-law's harassment | सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

ठाणे : ठाण्यातील प्रीती शिवकुमार जैयस्वाल (३५, रा. लोकमान्यनगर, ठाणे) या विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. आत्महत्येपूर्वी तिने आपल्यावर गुदरलेल्या अत्याचाराची माहिती देणारा व्हिडिओ रेकॉर्ड करून मैत्रिणींना पाठविला. पतीने तिच्या आजाराकडेही कसे दुर्लक्ष केले, याचाही उल्लेख तिने यात केला आहे.

प्रीतीच्या आजाराकडे दुर्लक्ष करताना डॉक्टरांकडे न नेता तिचा पती मेलीस तरी चालेल, असे निर्दयीपणे म्हटल्याचेही तिने या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये ती भावनाविवश होत आपल्यावरील अत्याचाराची कहाणी कथन करीत असल्याचे समोर आल्यामुळे पोलीसही अवाक् झाले. सासरचे आपल्याला खर्चासाठी एक छदामही देत नाहीत. त्यामुळे आपण पैसे जोडून शिलाई मशीन घेतली, तर तिचाही वापर करण्यास मज्जाव केला. आपण उचलत असलेल्या या टोकाच्या पावलाबद्दल स्वत:च्या आई-वडिलांची माफीही या संदेशात तिने मागितली आहे. घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी चौकशी करण्यात येत असून, दोषी असणाऱ्यांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष घाटेकर यांनी दिली.

Web Title: Suicide of a married woman due to her father-in-law's harassment