शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

घराला आग लावून मनोरुग्ण तरुणाची कळव्यात आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2017 11:42 PM

आपल्याच घराला आधी आग लावल्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन अजिंक्य रमेश निकाळजे (२१) या उच्चशिक्षित पण मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ठाणे : आपल्याच घराला आधी आग लावल्यानंतर नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन अजिंक्य रमेश निकाळजे (२१) या उच्चशिक्षित पण मनोरुग्ण तरुणाने आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. याप्रकरणी कळवा पोलीस अधिक तपास करीत आहेत.कळव्याच्या पारसिकनगर ‘मोरेश्वर को-आॅपरेटिव्ह सोसायटी’ या इमारतीच्या दुसºया मजल्यावर निकाळजे कुटुंब वास्तव्याला आहे. बुधवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरातून धूर आणि वास येत असल्याचे इमारतीमधील रहिवाशांच्या निदर्शनास आले. त्यांनी पोलीस आणि ठाणे अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिल्यानंतर हा प्रकार उघड झाला.गेल्या दोन वर्षांपासूनच ठाण्यातील एका बड्या मनोविकारतज्ज्ञांकडे अजिंक्यवर उपचार सुरू होते. पुण्यात त्याने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला होता. त्यात तो अनुत्तीर्ण झाला होता. यासह आणखी काही कारणांनी तो वैफल्यग्रस्त होता. त्याचे आईवडील दोन दिवसांपासून बाहेर गेले होते. बुधवारी सकाळी ७.३० ते ८ वा.च्या सुमारास त्याने घरात आग लावली. त्यानंतर, स्वयंपाकघरातील पंख्याला स्वत:ला गळफास लावून घेतला. आगीचा भडका वाढल्यानंतर नायलॉनची दोरी तुटल्यामुळे त्याचा मृतदेहही खाली पडल्याचे आढळले. दरम्यान, ही आग विझवण्यासाठी ठाणे अग्निशमन दलाच्या जवानांना त्यांच्या घराचा दरवाजा तोडावा लागला. आत आगीचे मोठे लोळ होते. बेडरूम तर जळून पूर्ण खाक झाली. स्वयंपाकगृहातील पंख्याला त्याने गळफास घेतलेला होता. नायलॉनची दोरी वितळल्याने तो खाली कोसळल्याचे चित्र पोलीस आणि अग्निशमन दलाला पाहायला मिळाले. घरातील आग अवघ्या अर्ध्या-पाऊण तासात नियंत्रणात आणून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. उत्तरीय तपासणीसाठी तो जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासात गळाफास घेतल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी पोलिसांना सांगितले.तुला सोडणार नाही...काहीसा मानसिक रुग्ण असलेल्या अजिंक्यची घरात नेहमीच चीडचीड असायची. त्यातूनच त्याचा मावस बहिणीवरही राग होता. याच रागातून त्याने भिंतीवर तिचे नाव टाकून ‘तुला सोडणार नाही’ असे लिहिल्याचे पोलिसांना आढळले.आईवडिलांनी केली होती तक्रारअजिंक्यचे घरातल्या व्यक्तींवर आरडाओरडा करणे अलीकडे जास्तच वाढले होते. आईवडिलांनाही शिवीगाळ करत अंगावर धावून जाण्याची त्याची मजल गेली होती. त्यामुळेच दोन दिवसांपूर्वी त्यांनी कळवा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध शिवीगाळ आणि मारहाण करत असल्याची तक्रार केली होती, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बुगडे यांनी दिली.

 

टॅग्स :Crimeगुन्हा