भिवंडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:40 IST2021-03-21T04:40:08+5:302021-03-21T04:40:08+5:30
भिवंडी : तालुक्यातील वडपे गावातील एका तरुणाने घरातील छताच्या लाकडी कडीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी ...

भिवंडीत युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
भिवंडी : तालुक्यातील वडपे गावातील एका तरुणाने घरातील छताच्या लाकडी कडीला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे. आत्महत्येचे कारण समजू शकलेले नसले तरी त्याने प्रेमसंबंध अथवा आर्थिक व्यवहारातून आत्महत्या केली असावी का, या दृष्टीने पोलिसांकडून तपास सुरू आहे.
जितेश तारे (२१, रा. वडपे) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. पदवीधर असलेला तारे सकाळी बँकेत गेला होता. त्यानंतर तो आरटीओ कॅम्पमध्ये ड्रायव्हिंग लायन्ससाठी चाचणी देऊन घरी आला. त्याने बेडरूमच्या दरवाजाची कडी लावून लाकडी कडीला गळफास घेऊन आत्महत्या केली. उशिरापर्यंत जितेश बेडरूम बाहेर न आल्याने त्याच्या कुटुंबीयांनी बेडरूमचा दरवाजा ठोठावण्याचा प्रयत्न केला. मात्र, आतून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दरवाजा तोडून पाहिले असता जितेश याचा मृतदेह साडीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. याबाबतची माहिती तत्काळ तालुका पोलिसांना दिली असता उपनिरीक्षक श्रेयन राठोड यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा केला. तारे याचा मृतदेह स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून मृतदेहाच्या शवविच्छेदनानंतर आत्महत्येची नोंद करण्यात आली.
----------------