शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शहरातील नियोजित मेट्रो स्थानकांना नावे सुचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 00:29 IST

मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे.

भार्इंदर : मीरा-भार्इंदरमधील नियोजित मेट्रोमार्गातील नऊ स्थानकांना नावे सुचवण्याचे आवाहन महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना केले आहे. यावर उद्याच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.नियोजित मेट्रोमार्ग दहिसर चेकनाका येथून विस्तारित करण्यात येणार असून त्यासाठी नऊ स्थानके निश्चित केली आहेत. मात्र, त्यांची नावे अद्याप निश्चित झालेली नसल्याने त्यांना सर्वानुमते मान्य ठरणारी नावेच देण्याचा निर्णय महापौरांनी घेतला आहे.या नियोजित नऊ मेट्रो स्थानकांत राष्टÑीय महामार्ग (मुंबई-अहमदाबाद महामार्ग) क्रमांक ८ वरील दहिसर चेकनाका परिसरातील पांडुरंगवाडी व अमर पॅलेस हॉटेल परिसरात दोन स्थानके निश्चित करण्यात आली आहेत. भार्इंदर पूर्वेकडील छत्रपती शिवाजी महाराज या मुख्य मार्गावर ५ स्थानके असून त्यात काशिमीरा वाहतूक बेटाजवळच्या झंकार कंपनी, मीरा रोड येथील साईबाबानगर, दीपक हॉस्पिटल, गोल्डन नेस्ट या बायपास मार्गावरील क्रीडासंकुल व इंद्रलोक या परिसरांचा समावेश आहे. भार्इंदर पश्चिमेकडे २ स्थानके प्रस्तावित असून त्यात मॅक्सस मॉल व नेताजी सुभाषचंद्र मैदान परिसराचा समावेश आहे. सुरुवातीला नियोजित मेट्रोमार्ग काशिमीरा वाहतूक बेटाहून छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर प्रस्तावित करण्यात आला होता. तो तत्कालीन महासभेच्या मान्यतेनंतर भार्इंदर पश्चिमेकडील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान व पूर्वेकडील इंद्रलोकपर्यंत विस्तारित केला. या नियोजित मार्गाच्या पाहणीसाठी एमएमआरडीएचे आयुक्त यू.पी.एस. मदान व अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांच्या शिष्टमंडळाने शहराला भेट देत मेट्रोच्या कारशेडसह स्थानकांच्या जागांची पाहणी केली होती. त्यात ९ मेट्रो स्थानकांच्या जागा निश्चित केल्या आहेत. त्याचा रीतसर ठराव महासभेत मंजूर करून पाठवण्याची सूचना पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांना एमएमआरडीएने पत्राद्वारे केली आहे.भाजपा गटनेत्यांनी नावे सुचवलीमहापौरांनी शिवसेना व काँग्रेस सदस्यांनीही त्या स्थानकांना नावे सुचवावी, असे आवाहन केले आहे. तत्पूर्वी भाजपाचे सभागृह नेते रोहिदास पाटील यांनी नियोजित मेट्रो स्थानकांना शहरातील प्रमुख गावांची नावे देण्याची मागणी महापौर व आयुक्त यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMetroमेट्रो