सुधीर वंजारी दुस-यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

By धीरज परब | Published: March 24, 2024 11:44 AM2024-03-24T11:44:19+5:302024-03-24T11:44:42+5:30

या आधी २०२२ साली त्यांचे नाव "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये आले होते . 

sudhir vanjari in the india book of records for the second time | सुधीर वंजारी दुस-यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

सुधीर वंजारी दुस-यांदा इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या गोडदेव भागातील राहणारे व मूळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडीचे असलेले सुधीर श्रीकृष्ण वंजारी यांनी "मार्शल आर्ट" या खेळामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये वयाच्या ५० वर्षाच्या वरच्या गटात खेळून ५० मेडल्स जिंकली असल्या बद्दल त्यांचे  नाव "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये आले आहे. या आधी २०२२ साली त्यांचे नाव "इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये आले होते . 

या आधी त्यांनी "कराटे” मध्ये १९८७ सालात जपान मध्ये त्यांनी मेडल जिंकले होते. त्यावेळी त्यांचे नाव २०२२ हया वर्षी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आले होते.  सुधीर वंजारी गेली ४३ वर्षे कराटे मध्ये सराव करत आहेत. ७ डिग्री ब्लॅक बेल्ट आहेत . त्यांनी आता पर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धा जिंकल्या असून अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत . गेली अनेक वर्ष ते मीरा भाईंदरच्या मूला-मूलींना कराटेचे प्रशिक्षण देत आहेत. 

Web Title: sudhir vanjari in the india book of records for the second time

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.