अचानक दरवाजा बंद झाला, दोन वर्षांचा चिमुकला घरात अडकला, अग्निशमन दलाकडून 'जित'ची सुखरूप सुटका
By जितेंद्र कालेकर | Updated: February 17, 2023 16:01 IST2023-02-17T16:00:36+5:302023-02-17T16:01:03+5:30
Thane News: अचानक दरवाजा बंद झाले आणि दोन वर्षीय जित घरात अडकल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात घडली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, रूमचा दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले.

अचानक दरवाजा बंद झाला, दोन वर्षांचा चिमुकला घरात अडकला, अग्निशमन दलाकडून 'जित'ची सुखरूप सुटका
ठाणे - अचानक दरवाजा बंद झाले आणि दोन वर्षीय जित घरात अडकल्याची घटना शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ठाण्यात घडली. वेळीच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत, रूमचा दरवाजा तोडून त्याला सुखरूप बाहेर काढले. हा प्रकार हिरानंदानी इस्टेट घडला.
हिरानंदानी इस्टेट,येथील इडन कॅस्टल बिल्डिंगच्या तेराव्या मजल्यावरील रूम क्रमांक- बी/१३०४ चा दरवाजा अचानक बंद झाला आणि घरात दोन वर्षीय जित हा मुलगा अडकला आहे. ही माहितीमिळाल्यानंतर घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी व बाळकूम अग्निशमन दलाचे जवान यांनी तात्काळ धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घराचा दरवाजा तोडून अडकलेल्या जित याला सुखरूप बाहेर काढून त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.