शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

जेजे मार्ग पोलीस ठाण्यातील 'ते ' यशस्वी योद्धा पुन्हा कर्तव्यावर रुजू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2020 21:54 IST

तिघांनी या विषाणूवर  यशस्वी मात केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते.उर्वरित सहकारी लवकरच सुखरूप परततील, असा आत्मविश्वास त्यांच्यातून व्यक्त झाला.

मुंबई -  एकाच पोलीस ठाण्यात सर्वाधिक जणांना कोरोनाची लागण झालेल्याने बदनाम झालेल्या जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील अधिकारी- अंमलदाराची प्रकृती झपाटयाने  सुधारत आहे. कोरोनावर यशस्वी मात करीत दोघा अधिकाऱ्यांसह तिघेजण शनिवारी पुन्हा कर्तव्यावर रुजू झाले. ठाण्यातील सर्वांनी टाळ्याच्या गजरात घोषणा देत या योद्धाचे स्वागत केले. 

तिघांनी या विषाणूवर  यशस्वी मात केल्याने सर्वांच्या चेहऱ्यावर हास्य पसरले होते.उर्वरित सहकारी लवकरच सुखरूप परततील, असा आत्मविश्वास त्यांच्यातून व्यक्त झाला. कोविंड -19 च्या विषाणूच्या अटकावासाठी प्रयत्नशील असणाऱ्या पोलिसांमध्ये या संसर्गाची झपाट्याने लागण होत गेली. तीन आठवड्यापूर्वी दक्षिण मुंबईतील जे जे मार्ग पोलीस ठाण्यातील तब्बल 46 जणांना त्याची बाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली होती. गृहमंत्री, पोलीस आयुक्तांनी पोलीस ठाण्याला आणि रुग्णालयाला  भेट देऊन अधिकारी, अंमलदार आणि त्याच्या कुटूंबियांची उपचाराबाबतची माहिती घेतली होती. कोरोना पॅझिटिव्ह असलेल्या एक  सहाय्यक निरीक्षक, उपनिरीक्षक व एका  कॉन्स्टेबलची   प्रकृतीत झपाटयाने सुधारणा होत गेली. त्याचे रिपोर्ट दोन वेळा निगेटिव्ह आल्याने डॉक्टरानी त्यांना कोरोनामुक्त झाल्याचे जाहीर केले होते. 

घरी थोडे दिवस विश्रांती घेतल्यानंतर तिघेजण शनिवारी पुन्हा पोलीस ठाण्यात रुजू झाले. त्याच्या स्वागतासाठी आवारात रांगोळी काढण्यात आली होती. सर्वजण पोलीस  उपायुक्तसह सर्व वरिष्ठ अधिकारी व अंमलदार  प्रवेशद्वारात येऊन थांबले होते. तिघांचे  टाळ्यांच्या गजरात  स्वागत करण्यात आले. सर्वानी  त्याच्या ध्येर्याला सलाम करीत त्याचे अभिनंदन केले.

टॅग्स :thaneठाणेThane Municipal Corporationठाणे महानगरपालिका