शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

शहापूर तालुक्यात मक्याच्या शेतीचा प्रयोग यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2021 11:50 PM

यावर्षी त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत त्यांनी स्वीट कॉर्नची शेती ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून केली आहे. या दोन एकरमध्ये त्यांनी तीनही प्लॉटमध्ये दहा दहा दिवसांचे अंतर ठेवून या पिकाची लागवड केल्याने हे पीक एकापाठोपाठ एक असे निघून त्याचा फायदा शेतकऱ्याला होत आहे.

जनार्दन भेरेलोकमत न्यूज नेटवर्कभातसानगर : शहापूर तालुक्यातील तुते या गावातील स्वामी विशे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतीत या वर्षी चक्क मक्याच्या शेतीचा प्रयोग यशस्वी केला असून असा हा तालुक्यातील पहिलाच प्रयोग असल्याने परिसरातील अनेक शेतकरी ही शेती पाहण्यासाठी येत आहेत. कारण केवळ पावसाळ्यात मक्याची लागवड केली जाते. त्यातच ती व्यवस्थित येत नाहीत. मात्र याला आता या शेतकऱ्याने छेद देत ही शेती यशस्वी केली आहे. भातसा धरणाच्या कालव्यातील पाण्यावर परिसरातील शेकडो शेतकरी शेतीबरोबरच भाजीपाल्याची पिके घेत आहेत. वर्षानुवर्षे एकच पीक, तोच भाजीपाला यामुळे सर्वत्र एकाच प्रकारचे पीक घेतल्याने शेतकऱ्याला त्या उत्पादनात भावही मिळत नाही. उलट व्यापारी त्या शेतकऱ्यांची भावाच्या बाबतीत पिळवणूक करत असतात. मात्र तुते येथील प्रयोगशील शेतकरी विशे हे दरवर्षी आपल्या शेतीत विविध प्रयोग करतात. त्यामुळे त्यांना त्याचा चांगला फायदा झाला आहे.

यावर्षी त्यांनी आपल्या दोन एकर शेतीत त्यांनी स्वीट कॉर्नची शेती ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करून केली आहे. या दोन एकरमध्ये त्यांनी तीनही प्लॉटमध्ये दहा दहा दिवसांचे अंतर ठेवून या पिकाची लागवड केल्याने हे पीक एकापाठोपाठ एक असे निघून त्याचा फायदा शेतकऱ्याला होत आहे.  या दोन एकर जागेत तीन हजार किलो किमतीचे नऊ किलो बियाणे, खत, ठिबक सिंचन यांचा असा एकूण ७० हजार रुपये खर्च झाला आहे.आता त्यांनी हे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली असून साधारण एक मका सहा रुपयाला विकला जात आहे. त्यांना मागणीही अधिक प्रमाणात आहे. त्यांच्या ७० किलोच्या एका पोत्याला ४०० रुपये भाव मिळत असून त्यांची दररोज सहा पोती बाजारात विक्रीसाठी जातात. त्यातून त्यांना अडीच हजार रुपये मिळतात. आतापर्यंत त्यांनी झालेला खर्च वसूल केला असून आपल्याला या शेतीतून दोन लाख रुपये इतका नफा मिळेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे. 

या शेतकऱ्याने केलेली मक्याची शेती. हा तालुक्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग आहे.        -पंढरीनाथ पाटील, मंडळ कृषी     अधिकारी

अशाच प्रकारची शेती तालुक्यात झाल्यास शेतकऱ्यांना वेगळी दिशा मिळण्यास नक्कीच मदत होईल.    -अमोल अगवान, तालुका कृषी     अधिकारी 

टॅग्स :thaneठाणे