गोलतकरांचे पॉवर लिफ्टिंगमध्ये यश

By Admin | Updated: December 26, 2016 07:19 IST2016-12-26T07:19:00+5:302016-12-26T07:19:00+5:30

थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफिटंग स्पर्र्धेत शहरातील अंकुश गोलतकर यांची निवड झाली. एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून

Success in the power lifting of the goalkeepers | गोलतकरांचे पॉवर लिफ्टिंगमध्ये यश

गोलतकरांचे पॉवर लिफ्टिंगमध्ये यश

उल्हासनगर : थायलंड येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफिटंग स्पर्र्धेत शहरातील अंकुश गोलतकर यांची निवड झाली. एका कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून असलेल्या अंकुशचे या यशासाठी सर्वत्र अभिनंदन होत आहे.
उल्हासनगर कॅम्प नं-४ येथील चाळीवजा घरात राहणा-या अंकुश गोलतकर याला लहानपणा पासूनच व्यायामाचा छंद होता. एका होतकरू प्रशिक्षकाने अंकुश यााच्यातील गुण बघून पॉवर लिफिटंग स्पर्धेत भाग घेण्याचा सल्ला दिला. तसेच मोफत प्रशिक्षण देण्याची तयारीही दर्शवली. त्यांना गुरूस्थानी मानून अंकुशने पॉवर लिफिटंग स्पर्धेत भाग घेणे सुरू केले.
ठाणे येथे झालेल्या स्पर्धेत ११० किलो गटात अंकूशने सिल्वर पदक मिळविले. तसेच देशपातळीवरील अनेक स्पर्धा गाजविल्या आहेत. वडीलाची गिरणी बंद पडल्याने ते शिवणकाम तर आई घरकाम करून वडीलाच्या कामात हातभार लावतात.
रायपुर येथे आॅगस्ट २०१६ मध्ये झालेल्या नॅशनल पॉवर लिफिटंग स्पर्धेत देशा तर्फे खेळून कास्य पदक पटकावले. देशात क्रिकेटला मान असून इतर खेळांची प्रसिध्द कमी व मान नसल्याची खंत त्यांने व्यक्त केली. फेबु्रवारी २०१७ मध्ये थायलंड येथे आंतरराष्ट्ीय पॉवर लिफिटंग स्पर्धा होत असून त्या स्पर्धेसाठी निवड झाल्याची माहिती अंकुश गोलतकर यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Success in the power lifting of the goalkeepers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.