शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाणे जिल्ह्यातील मोबाईल स्कूलला यश; यंदा रस्त्यावरील ४५० मुले जाणार शाळेत!

By सुरेश लोखंडे | Updated: June 14, 2024 18:15 IST

हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.

ठाणे : रस्त्यावरील बालकांना समाजाच्या मुख्यप्रवाहात आणण्यासाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजना हाती घेतली आहे. यामध्ये फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना राबविली जात असून या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई व अंबरनाथ नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील ४५० ते ५०० बालकांना यंदाच्या २०२४ -२५ या शैक्षणिक वर्षात महापालिकेच्या शाळेमध्ये प्रवेश दिला जात आहे. हा शालेय प्रवेशाचा कार्यक्रम २० जून रोजी होणार आहे, अशी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड यांनी दिली.रस्त्यावरील बालकांसाठी महिला व बाल विकास विभागाने नाविन्यपूर्ण योजनेच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात फिरतेपथक (मोबाईल स्कूल) ही संकल्पना ठाणे जिल्ह्यासह राज्यातील सात जिल्ह्यांमध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून राबविली जात आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये १ फेब्रुवारी ते ऑगस्ट२०१३ पर्यंत हा कार्यक्रम अतिशय यशस्वीरित्या राबविण्यात आला. साधारणतः १७० रस्त्यावरील बालकांना २०२३ - २०२४ या शैक्षणिक वर्षामध्ये ठाणे व भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवून देण्यात आला हाेता. आता या या प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यात नवी मुंबई महानगरपालिका व अंबरनाथ नगरपरिषद यांच्या कार्यक्षेत्रातील रस्त्यावरील बालकांबरोबर महिला व बालविकास विभागाच्या ठाणे कार्यालयाने गेले ६ ते ७ महिने काम करुन बालकांमध्ये व त्यांच्या पालकांमध्ये शिक्षणाची गोडी वाढविली आहे. या बालकांना शाळेमध्ये प्रवेश द्यावा व त्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावे, यासाठी बालकांचे समुपदेशन करण्यात आले आहे. त्यानुसार यावर्षी २०२४-२५ च्या शैक्षणिक वर्षामध्ये रस्त्यावर राहणारी व शाळेत न जाणारी ४५० जे ५०० बालके विविध महानगरपालिकेच्या शाळांमध्ये दाखल करण्यात येणार आहेत.

              या बालकांच्या शाळेचे प्रवेशपत्र महिला व बालविकास विभागाचे सचिव अनुप कुमार यादव, यांच्या शुभहस्ते वितरीत करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास महिला व बालविकास आयुक्त उपस्थित राहणार असून जिल्हाधिकारी अशोक शिनगारे हे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी असणार आहेत. तसेच या वर्षात १० वी, १२ वी उत्तीर्ण झालेल्या बालगृहातील ५० मुलांचा सत्कार सोहळा यावेळी आयोजित करण्यात आला आहे, असे गायकवाड यांनी सांगितले. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी