स्टंटबाजी ही मनसेची जुनी खोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:38 IST2021-03-24T04:38:00+5:302021-03-24T04:38:00+5:30

कल्याण : मनसे नेहमी विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करते. असा प्रकारच्या खोडसाळपणा करण्याची त्यांना सवयच असून, वडवली पुलाचे ...

Stunting is an old MNS hoax | स्टंटबाजी ही मनसेची जुनी खोड

स्टंटबाजी ही मनसेची जुनी खोड

कल्याण : मनसे नेहमी विकासकामाचे श्रेय घेण्यासाठी राजकीय स्टंटबाजी करते. असा प्रकारच्या खोडसाळपणा करण्याची त्यांना सवयच असून, वडवली पुलाचे बेकायदेशीर लोकार्पण करणारी मनसे ही आयत्या बिळावर नागोबा असल्याची टीका शिवसेनेचे कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी मंगळवारी केली. वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे अधिकृत लोकार्पण लवकरच केले जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.

वडवली रेल्वे उड्डाणपुलाचे लोकार्पण सोमवारी सायंकाळी आयोजिले होते. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे ते रद्द करण्यात आले. त्याची माहितीही सर्व आमंत्रित आमदारांना दिली होती. तरीदेखील मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मनसे कार्यकर्त्यांसह जाऊन पुलाचे बेकायदेशीररीत्या लोकार्पण करून तो वाहतुकीसाठी खुला केला. यानंतर भोईर यांनी मनसेवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने या पुलासाठी पाठपुरावा केला आहे. विशेष म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या जागेचा प्रश्न उद्‌भवला तेव्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून तो मार्गी लावला. शिवसेना पाठपुरावा करून विकासकामे मार्गी लावते. परंतु, त्यांचे श्रेय घेण्याचे काम मनसेकडून केले जाते, असे ते म्हणाले.

---------------------------

Web Title: Stunting is an old MNS hoax