शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विद्यार्थ्यांचे वृक्षबंधन, झाडांना बांधली राखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 01:22 IST

टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या बांधून ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा संदेश

ठाणे : शालेय विद्यार्थ्यांनी गुरुवारी राममारुती रोड येथील झाडांना राखी बांधून जणू वृक्षबंधनच साजरे केले. यावेळी त्यांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या राख्या बांधून ‘झाडे जगवा, झाडे वाचवा’चा संदेश ठाणेकरांना दिला. न्यू इंग्लिश स्कूल आणि नेचर अ‍ॅक्टिव्हिटीज फॉर सस्टेनेबल अ‍ॅपरोच (नासा) यांच्या संयुक्त विद्यमाने हे अनोखे रक्षाबंधन साजरे झाले.शहरात होत असलेली वृक्षांची कत्तल लक्षात घेता विद्यार्थ्यांनी वृक्षतोड थांबवण्याचे आवाहन करून संकटात सापडलेल्या झाडांना पर्यावरणपूरक राख्या बांधून ‘तुम्ही झाडांना वाचवा, ते तुम्हाला वाचवतील’ असा संदेश दिला. झाडांसाठी राख्या तयार करताना त्यांनी गवत, झाडांची पाने, नारळाच्या करवंट्या, सुतळी या टाकाऊ वस्तूंचा कल्पकतेने वापर करून राख्या तयार केल्या. विशेष करून मिकीमाउस, पंखा, निसर्ग, झाड, तिरंगा या प्रकारांच्या राख्या होत्या. झाडांना भाऊ मानून आनंद झाल्याच्या भावना यावेळी चिमुकल्यांनी व्यक्त केल्या.वृक्षांना राखी बांधून आनंद झाला असल्याची भावना इयत्ता सातवीच्या अंकिता शेंगळे हिने व्यक्त केली. झाडांना राखी बांधण्यासाठी मी पानांची राखी तयार केली.प्रदूषणापासून झाडे आपले रक्षण करतात, त्यामुळे त्यांनाही राखी बांधली पाहिजे, असे सातवी इयत्तेतील पार्थ मोरे याने सांगितले.यावेळी शाळेचे विश्वस्त आल्हाद जोशी, जलशास्त्रज्ञ डॉ. प्रमोद साळसकर, मुख्याध्यापक भानुदास तुरूपमाने, नासाचे राजीव डाके, प्रशांत सिनकर, प्रतिभा काटकर, राजेश आखडमल, पी.आर. टोम्पे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Raksha Bandhanरक्षाबंधनthaneठाणेSchoolशाळाStudentविद्यार्थी