शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यस्तरीय ‘रंगाेत्सव’ कार्यक्रमासाठी आसनगावचे विद्यार्थी!

By सुरेश लोखंडे | Updated: March 19, 2024 16:00 IST

राज्यस्तरीय शिक्षण विभागा हा 'रंगोत्सव' नुसता रंगांचा नव्हे, तर शैक्षणिक उपक्रमांचा आणि नवनव्या अध्ययन-अध्यापन प्रयोगांचा आहे.

ठाणे : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणेतर्फे आयोजित राज्यस्तरीय ‘रंगोत्सव कार्यक्रम २०२३-२४’ या कार्यक्रमासाठी घेतलेल्या जिल्हा निवड चाचणीत, जिल्ह्यातील आसनगाव येथील एन. जे. बेलवले पब्लिक स्कूलचा संघ प्रथम येऊन त्यास पुणे येथील स्केर्टच्या राज्यस्तरीय सादरीकरणासाठी संधी मिळाली. हा कार्यक्रम साेमवारी पार पडला.

             राज्यस्तरीय शिक्षण विभागा हा 'रंगोत्सव' नुसता रंगांचा नव्हे, तर शैक्षणिक उपक्रमांचा आणि नवनव्या अध्ययन-अध्यापन प्रयोगांचा आहे. या 'रंगोत्सव' उपक्रमासाठी या प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील शाळांकडून व्हिडीओ स्वरूपात प्रस्ताव मागविले होते. त्यातून उत्तम प्रयोगांची या रंगोत्सवाकरिता निवड करण्यात आली आहे. अध्ययन-अध्यापनात विशिष्ट कृतींचा समावेश केल्यास शिक्षण प्रक्रिया कशी प्रभावी होऊ शकते, याचे सादरीकरण या रंगोत्सवात केले आहे.             शहापूर तालुक्यातील एन. जे. बेलवले पब्लिक स्कूल आसनगाव, या शाळेने इयत्ता तिसरीतील गणित विषयावर भौमितिक आकार या घटकावर आर्ट इंटिग्रेटेड लर्निंग या अध्यापन पद्धतीचा वापर करून सादरीकरण केले आहे. विशेष कौतुकाची बाब म्हणजे या सादरीकरणास सर्वोत्कृष्ट सादरीकरण म्हणून स्केर्ट पुणे येथे गौरवण्यात आले. यासाठी विद्यार्थ्याना घडवण्यात आलेल्यांमध्ये सोनाली चौधरी, मधुरा सुरोशे आदी शिक्षकांचा समावेश आहे. तर विद्यार्थांमध्ये जयाद्री भाबड, जेसिका बर्नार्ड, जान्हवी हरीनामे, धनश्री भिसे, ईश्वर दिनकर, श्रावणी शिंदे, श्रेया मोरे, स्वरूपा पानसरे आदींचा समावेश असल्याचे वास्तव येथील जेष्ठ शिक्षक सुधीर भाेईर यांनी लाेकमतला सांगितले. 

टॅग्स :Studentविद्यार्थीSchoolशाळा