शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

कल्याण शहराजवळच्या गावांतील विद्यार्थ्यांचा जीवघेणा शाळा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:17 PM

मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांनास्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत.

सुरेश लोखंडेठाणे : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या ठाणे, पालघर जिल्ह्यांतील शहरांना स्मार्ट सिटीचे वेध लागले आहेत. एकीकडे शहरे स्मार्ट होत असताना या जिल्ह्यांतील ग्रामीण, आदिवासी दुर्गम भागांच्या समस्या कायम आहेत. विद्यार्थ्यांना अजूनही नदीनाल्यांतून जीवघेणा प्रवास करून शाळा गाठावी लागत आहे. ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहराजवळील गावांसह शहापूर, मुरबाड, भिवंडी तालुक्यांत, तर पालघर जिल्ह्यातील मोखाडा, डाहाणू, जव्हार आणि तलासरीतील विद्यार्थी पाण्यातून मृत्यूची वाट तुडवत शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना झगडावे लागत असल्याचे विदारक चित्र दुर्गम भागात दिसत आहे.अहमदनगर महामार्गावरील कल्याण तालुक्यातील मामणोली गावापासून तीन किलोमीटरवरील बांगरवाडीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी नदीनाल्यांच्या पाण्यातून वाट काढत चौथी इयत्तेनंतरचे शिक्षण घेण्यासाठी कुंदे येथील शाळेत जात आहेत. बांगरवाडीत ४० घरे आहेत. पाण्याशी दोन हात करून विद्यार्थ्यांना प्रवास करून शाळेत जावे लागत असल्याची शोकांतिका पाहायला मिळत आहे. बांगरवाडीपासून कुंदे गावापर्यंतचा काही रस्ता सिमेंट काँक्रीटचा आहे; पण २०० मीटरचा रस्ता हा जागेच्या वादामुळे अपूर्णावस्थेत आहे. याच रस्त्यावरून नाल्यासारखे पाणी वाहत आहे. त्या पाण्यातून रस्त्याचा अंदाज घेत विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना तीन ते चार फूट पाण्यात वाट काढावी लागत आहे.विद्यार्थी आपली दप्तरे कशीबशी सांभाळत डोक्यावर घेऊ न या पाण्यातून शाळेत जातात. त्यांना ओल्या गणवेशातच वर्गात शिक्षण घ्यावे लागत आहे. या रस्त्यावरील वाहत्या पाण्यातून विद्यार्थी वाहून जाण्याची भीती आहे.शाळेची ओढ लागलेले विद्यार्थी-विद्यार्थिनी एकमेकांचा हात धरून पाण्यातून वाट काढत शिक्षण घेत आहेत. याप्रमाणेच शहापूर तालुक्यातील डिंभे येथील सुमारे ५० विद्यार्थी नदीनाले आणि ओहोळाच्या पाण्यातून टहारपूर येथील संत ज्ञानेश्वर विद्यामंदिर शाळेत जात आहेत. याशिवाय, भिवंडी तालुक्यातील बीजपाडा येथील २५ विद्यार्थी शहापूर तालुक्यातील पिवळी येथील किल्ले माहुली ग्रामीण विद्यालयात नदीओढे पार करून येतात. तानसा अभयारण्यातील या दोन्ही गावांच्या विद्यार्थ्यांना नदीनाल्यांच्या पुराशीही सामना करावा लागतो. सुमारे तीन ते चार किलोमीटर अंतर या विद्यार्थ्यांना पायी प्रवास करावा लागत आहे. मुरबाड तालुक्यातील टोकावडेच्या जंगलपट्ट्यात, शाई, काळूच्या खोऱ्यांतील काही गावपाड्यांच्या विद्यार्थ्यांना असाच प्रवास करत शिक्षण घ्यावे लागत आहे.>पालघरमध्ये होडी, टायरवरून प्रवासपालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यामधील तलवाडा गावाजवळील भावडी गावातील विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना १२ महिने लाकडी होडीतून प्रवास करावा लागतो. १०० मीटर नदीचे पात्र ओलांडून विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते. त्यासाठी शासनाने काहीही व्यवस्था केलेली नाही. गावकऱ्यांनीच लाकडी होडी तयार करून व्यवस्था केली आहे.विक्रमगड तालुक्यातील म्हसा या गावातील विद्यार्थिनी-विद्यार्थी नदीच्या पाण्यात टायर सोडतात. या नदीपात्रात तरंगणाºया टायरवर बसून विद्यार्थी नदीतून प्रवास करून वाकी येथे शाळेत जातात. जव्हारच्या डोंगरपाड्यातील, डहाणूतील आष्टेपाडा येथील विद्यार्थीही ओहोळाच्या पाण्यातून वाट काढून शाळेत जातात. धांगडा, डोंगरशेत परिसरातील विद्यार्थ्यांनाही जीवघेणा प्रवास करावा लागत आहे.काळू नदीला पूल नसल्यामुळे नदीच्या पाण्यातून तलासरीच्या सावरोली-अणवीर या ग्रामपंचायतींच्या क्षेत्रातील विद्यार्थ्यांना प्रवास करावा लागत आहे. मोखाडा तालुक्यातील बोटोशी, आमळे, घोडीपाडा, मुकुंदपाडा, कोल्हेधाव, बालघोडा, कुरलोड पीकी, आंब्याचापाडा, रायपाडा आदी गावांतील विद्यार्थ्यांना नदीपात्रातून येजा करावी लागते. या जीवघेण्या प्रवासामुळे अनेक मुलांनी शाळाच सोडली आहे. जव्हार तालुक्यातील सारसून, खंडीपाडा, विनवल, माळघर, दापटी, वांगणी, बेहडपाडा या गावांचा रस्त्यातील मोरीचा पाइप दोन ठिकाणी फुटला आहे. त्यातील पाण्यात पडून जीवितहानी होण्याची शक्यता गावकºयांसह विद्यार्थी वर्तवत आहेत.