काळूवर विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
By Admin | Updated: November 17, 2016 04:56 IST2016-11-17T04:56:52+5:302016-11-17T04:56:52+5:30
शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील काळू नदीवर जि़ प.चे समाजकल्याण सभापती धर्मादादा गोवारी यांच्या उपस्थित वनराई बंधारा बांधण्या आला.

काळूवर विद्यार्थ्यांनी बांधला बंधारा
विक्रमगड : सद्गुरुनाथ दादा (भागवत) विद्या निकेतन, सुत्रकार, शाळेच्या पहिल्याच दिवशी येथील काळू नदीवर जि़ प.चे समाजकल्याण सभापती धर्मादादा गोवारी यांच्या उपस्थित वनराई बंधारा बांधण्या आला. इ. ८ वी ते १० वी च्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने तो साकारला. त्याचा उपयोग सुमारे १ कि़ मी़ पर्यतच्या लोकांना होणार आहे, असे प्रतिपादन शाळेचे मुख्याध्यापक सुधाकर पाटील यांनी केले़ यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाने सहकार्य केले़ यावेळी विद्यार्थ्यांनी सहभोजनाचा आनंदही लुटला.
शासनाच्या नव्या स्वरुपातील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेस विक्रमगड तालुक्यात चांगला प्रतिसाद असून संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी शासनाने पाणी आडवा पाणी जिरवा हे धोरण प्राधान्याने राबवून विक्रमगड पंचायत समितीने ग्रामपंचायत हददीतील वनराई बंधा-यांची कामे हाती घ्यावी, अशी मागणी जनतेने केली आहे.
गेल्या दोन चार वर्षासून विक्रमगड तालुक्यात वनराई बंधा-याची कामे मंदावली आहेत. यंदा बंधा-यांची कामे कधी चालू करणार असा सवाल मजुराकडून विचारला जात आहे़ कारण पाण्याचे साठे कमी झाल्यानंतर बंधारे बांधून काय उपयोग? पाणी असे पर्यंतच बंधा-यांची कामे होणे गरजेचे आहे़ इतर तालुक्यात वनराई बंधा-यांची कामे चालू झाली असल्याचेही समजते़
विक्रमगड तालुक्यात रोजगारहमी योजनेअंतर्गत गेल्या वर्षीच्या नोंदणी नुसार ६७ हजार मजूर कुटुंबाची नोंदणी करण्यांत आली आहे़ त्यांना शंभर टक्के जॉब कार्डे देण्यांत आली असून त्यांची बँक खातीही उघडण्यात आली आहेत़
पर्जन्याचे प्रमाण कमी झाल्याने दिवसेंदिवस भूजलपातळी कमी होऊन सर्वत्र पाणी टंचाईची समस्या तीव्र होत चाललेली आहे़ त्यामुळे पाणी अडविल्यास त्याचा उपयोग शेतीसाठी, गुरांना पिण्यासाठी होईलच, परंतु भूजल पातळीही वाढेल. (वार्ताहर)