विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2019 23:50 IST2019-07-13T23:50:04+5:302019-07-13T23:50:26+5:30

शाळेतून घरी चाललेल्या विद्यार्थिनीला घरी सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेल्या रिक्षाचालकाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली.

Student sexually abusing the accused | विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करणारा अटकेत

मुंब्रा : शाळेतून घरी चाललेल्या विद्यार्थिनीला घरी सोडण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केलेल्या रिक्षाचालकाला मुंब्रा पोलिसांनी अटक केली.
डोंबिवली येथील शाळेत भावाबरोबर शिकत असलेली दिव्यातील मुंब्रादेवी कॉलनीमध्ये राहणारी १५ वर्षांची विद्यार्थिनी बुधवारी संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर घरी चालली होती. शाळेच्या प्रवेशद्वाराजवळ तिला भेटलेल्या अगस्त शुक्ला या ओळखीच्या रिक्षाचालकाने तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवले. ती रिक्षात बसल्यानंतर त्याने फिरायला नेण्याच्या निमिताने डोंबिवलीमधील मानपाडा परिसरात असलेल्या एका उद्यानामध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केला. सकाळी ७ वाजता घरी आल्यानंतर तिने घडलेली घटना पालकांना सांगितली. पीडित मुलीने तक्र ार दाखल केल्यानंतर दोन तासांत पोलिसांनी शुक्लाला अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अरु ण क्षीरसागर यांनी दिली.

Web Title: Student sexually abusing the accused