करवसुलीसाठी विद्यार्थ्यांचा आधार

By Admin | Updated: November 17, 2016 07:30 IST2016-11-17T07:30:17+5:302016-11-17T07:30:17+5:30

मीरा-भार्इंदर पालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातून जमा करण्याच्या मोहिमेंतर्गत सुमारे १२ कोटींचा मालमत्ताकर वसूल केला आहे.

Student base for tax collection | करवसुलीसाठी विद्यार्थ्यांचा आधार

करवसुलीसाठी विद्यार्थ्यांचा आधार

भार्इंदर : मीरा-भार्इंदर पालिकेने रद्द झालेल्या नोटा कराच्या माध्यमातून जमा करण्याच्या मोहिमेंतर्गत सुमारे १२ कोटींचा मालमत्ताकर वसूल केला आहे. ही वसुली एकूण उद्दिष्टांपैकी सुमारे साडेआठ टक्के एवढीच असल्याने ती अधिकाधिक होण्यासाठी पालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा आधार घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्य सरकारने एक हजार, पाचशेच्या नोटा जमा करण्यासाठी पालिकेला २४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. तत्पूर्वी पालिकेने चलनातून बाद झालेल्या नोटा १० नोव्हेंबरपासून कराच्या माध्यमातून स्वीकारण्यास सुरुवात केली. १० ते १५ नोव्हेंबरपर्यंत पालिकेने विविध करांच्या माध्यमातून सुमारे २४ कोटींची वसुली केली. हा आकडा १६ नोव्हेंबरपर्यंत ४ कोटींनी वाढला. एकूण २८ कोटींची करवसुली पालिकेने जुन्या नोटांच्या आधारावर वसूल केली असली तरी कित्येकांनी आपले काळे धन कराच्या माध्यमातून पांढरे केल्याचे बोलले आहे.
पालिकेच्या उत्पन्नात भर पाडण्याची संधी मिळाल्याने ती कोणत्याही परिस्थितीत घालवायची नाही, असा निर्धार आयुक्तांनी केला आहे. त्यासाठी १३ नोव्हेंबरपासून अधिकारी, कर्मचाऱ्यांना करदात्यांच्या दारी धाडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तासागणिक वसुलीचा आकडा वाढत असला तरी तो पर्याप्त ठरलेला नाही.
पालिकेच्या २०१६-१७ या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात केवळ मालमत्ताकराचे एकूण उद्दिष्ट १४० कोटींचे निश्चित केले आहे. आजमितीस करवसुली ४२ कोटींपर्यंत पोहोचली आहे. त्यात यंदाच्या १२ कोटींचा समावेश आहे. एकूण उद्दिष्टांपैकी साडेसात महिन्यांत पालिकेने एकूण ३० टक्के करवसुली केली असून उर्वरित साडेचार महिन्यांत पालिकेला ७० टक्के मालमत्ताकराची वसुली करावी लागणार आहे. ती २४ नोव्हेंबरपर्यंत अधिकाधिक होण्यासाठी विद्यार्थ्यांद्वारे करवसुलीची मोहीम सुरू केली जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Student base for tax collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.