विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 19:13 IST2017-07-18T19:13:21+5:302017-07-18T19:13:21+5:30

खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे.

Student arrested for molestation | विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्यास अटक

आॅनलाईन लोकमत
ठाणे, दि. 18 : खासगी शिकवणीला जाणाऱ्या एका १७ वर्षीय विद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या अल्पवयीन मुलाला ठाणेनगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याची जामिनावर सुटका झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ठाण्याच्या महागिरी कोळीवाडा परिसरात राहणारी ही मुलगी आणि आरोपी एकाच परिसरात वास्तव्याला आहेत. दोघेही दहावीला असून वेगवेगळ्या शाळेत आहेत. ८ जुलै रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास ती ठाणे रेल्वे स्थानकाजवळील एका खासगी क्लासमधून अशोक सिनेमा ते दादोजी कोंडदेव क्रीडा संकूल या मार्गावरुन ती घरी जात असतांना ‘निवास चेंबर्स’ या इमारतीजवळ त्याने तिचा पाठलाग करून विनयभंग केला. तिच्याकडे त्याने एकतर्फी प्रेमाची मागणीही केली. तिने त्यास स्पष्ट नकार दिल्यामुळे तो तिचा वारंवार पिच्छा करीत होता. या सर्व प्रकाराला कंटाळून तिने १६ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. त्याला उपनिरीक्षक मयुरी गिते यांच्या पथकाने १७ जुलै रोजी सायंकाळी ताब्यात घेतले. या मुलाच्या चांगल्या वर्तणुकीबाबत त्याच्या पालकांनी दिलेल्या हमीवर ठाण्याच्या बाल न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदार धर्माधिकारी यांनी दिली.
.............

Web Title: Student arrested for molestation